shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवगाव येथील यंदाचा रेणुकामाता यात्रा महोत्सव रद्द उपसरपंच अतुलदादा मुंडे..!!

प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी :- 
देवगाव येथील दि.27 एप्रिल वार मंगळवार रोजी होणारा रेणुकामाता देवीचा यात्रा महोत्सव यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आला असल्याचे देवगावचे उपसरपंच अतुलदादा मुंडे यांनी कळविले आहे.

केज तालुक्यातील देवगाव येथे रेणुकामाता देवीचे जागृत देवस्थान आहे, दरवर्षी रेणुकामाता देवीच्या मंदिर परिसरात यात्रा महोत्सव आयोजित केला जातो. सदरील यात्रा महोत्सवाला देवगाव पंचक्रोशीतील तसेच बाहेरगावातून सुद्धा बरेचसे भाविक देवीवर असलेल्या श्रद्धेपोटी यात्रेला येवून रेणुकामातेचं दर्शन आणि आशिर्वाद घेत असतात. मागच्या वर्षी संपूर्ण जगावर आलेलं संकट म्हणजे कोविड-19 मुळे लॉकडाऊन लावला गेला आणि त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी रेणुकामातेची यात्रा स्थगित करण्यात आली होती. 

यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे, या भयंकर अशा संकटाला तोंड देण्यासाठी राज्य तथा देश पातळीवर विविध प्रयत्न चालू आहेत, यातून आपली सर्व माणसं सहिसलामत राहावीत यासाठी कोरोना वॉरियर्स प्राणपणाने लढत आहेत, ही सर्व परिस्थिती लक्षात घेवून प्रशासनाला योग्य सहकार्य करण्याच्या हेतूने व भाविकांच्या सुरक्षेसाठी याही वर्षी दि.27 एप्रिल  रोजी होणारा भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुकामाता देवीचा यात्रा महोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे देवगावच्या सरपंच सौ.सुरेखा शिवाजी गायकवाड व उपसरपंच श्री.अतुलदादा मुंडे यांनी कळविले आहे. सर्वांनी आपली व आपल्या कुटूंबाची योग्य काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, योग्य अंतर ठेवून लसिकरणाला प्रतिसाद दयावा, कोणतेही दुखणे अंगावर न काढता तपासणी करून उपचार करून घ्यावेत असे आवाहन अतुलदादा मुंडे यांनी केले आहे.
close