shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'शिर्डी एक्सप्रेसच्या बातमीची दखल ' पालिकेकडून पाण्याच्या वॉल गळतीची दुरुस्ती करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरु ....!

नगर शहर । प्रतिनिधी : 
दि . १९ एप्रिल रोजी सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील ज्ञानसंपदा शाळेसमोरील पाण्याच्या वॉल गळतीमुळे दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे आणि साचलेल्या पाण्यामुळे होणारे अपघात याबद्दल शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह घ्या माध्यमातून सदर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

सदर ठिकाणावरील वॉल दुरुस्त करण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी होती. दुषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

सदर बातमीची दखल संबंधीत विभागाकडून घेण्यात आली असून हा वॉल पालिकेकडून दुरुस्त करण्यात आला आहे . परिसरातील नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या रस्त्यावर साचचेल्या पाण्यामुळे ये - जा करणाऱ्या वाहनांचाही त्रास यामुळे कमी होणार आहे.
close