shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने कै. अशोक दगडु तुपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

श्रीरामपूर ( प्रतिनिधी) :- येथील दै. लोकसत्ता चे पत्रकार अशोक दगडु तुपे वय ५७ यांचे दि.२२-४-२०२१ रोजी दुपारी २ वाजता अहमदनगर येथील साई दिप हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई, पत्नी तीन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.

 पोलीस कर्मचारी दिलीप तुपे, कान्हेगाव, ता. श्रीरामपूर प्रगतशील शेतकरी विलास तुपे व शिक्षक किशोर तुपे यांचे ते भाऊ तर अभिजीत व निखिल तुपे यांचे ते वडील होत. त्यांच्या कुटुंबियांचे या दुःखातून परमेश्वर सांत्वन करो व कै. अशोक तुपे यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने अर्पण करण्यात आली. 

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक, अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीरमोहंमद, प्रदेश सचिव किशोर गाडे, प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, जिल्हाकार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष इदरीस भाई शेख, संगमनेर तालुका अध्यक्ष दस्तगीर शाह, संगमनेर शहराध्यक्ष शहानवाज बेगमपूरे, घोटी तालुकाध्यक्ष आसिफ अली सय्यद, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान पठाण, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, चांदवड तालुका उपाध्यक्ष रवींद्र केदारे, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटे मिया, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ.संगीता वाबळे, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख, शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जाद भाई पठाण, शेवगाव तालुका सचिव जमीर भाई शेख, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जीशान काजी, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, येवला शहराध्यक्ष हाजी कलीम शेख, नाशिक शहराध्यक्ष अन्वर पठाण, राहाता तालुकाध्यक्ष विजय खरात, राहाता तालुका सचिव गोरक्षनाथ गाढवे, राहाता तालुका उपाध्यक्ष शब्बीर भाई कुरेशी, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे शहराध्यक्ष हाजी हनीफ भाई तांबोळी, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोकराव कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफ भाई शेख, तसेच अकबर भाई शेख, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, अक्रम कुरेशी, अमीर बेग मिर्झा, साईनाथ बनकर आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
close