प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी :-
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन संस्थेमार्फत करोना महामारी च्या लढ्यासाठी सामाजिक कामाचा वसा घेऊन सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, विटामिन सी, विटामीन बी कॉम्प्लेक्स, पॅरासिटामोल टॅबलेट इत्यादी इत्यादींचे मोफत वाटप करण्यात आले,या शिबिरासाठी पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे सपोनि विजय आटोळे , गोपनीय शाखेचे बालाजी ढाकणे साहेब,राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन चे नूतन अध्यक्ष डॉ दत्ता तपसे, सचिव ज्ञानेश्वर गिरी ,कोषाध्यक्ष महादेव राऊत ,सदस्य संजय भालेराव, रामभाऊ राऊत, गुणवंत ईखे ,प्रा यांची उपस्थिती होती.
दहिफळे यांनी बोलताना सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले. सध्याच्या काळामध्ये दुखणे अंगावर काढू नये व लवकरात लवकर तपासणी करून उपचार घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ दत्ता तपसे यांनी केले आहे.
महापुरुषांच्या जयंती निमित्त कोरोनाच्या संकटामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर औषध गोळ्या वाटप करून संस्थेने सामाजिक वसा जोपासला आहे अशी प्रतिक्रिया पोलीस कर्मचारी यांनी दिली.

