shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नियमनात्मक आदेश जारी..!

अहमदनगर:- जिल्हयात दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी श्री रामनवमी उत्सव आहे. सध्या कोविड-19 चा प्रादुर्भाव चालु असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासनाने धार्मिक, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकीस बंदी  केली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36अन्वये आदेश जारी करण्यात आला आहे. 
 
दिनांक 21 एप्रिल, 2021 रोजी श्री रामनवमी उत्सवा निमित्त काढण्यात येणा-या मिरवणुकीचे वेळी शांतता व सुव्यवस्था राखणे, वाद्यांवर नियंत्रण, ध्वनीक्षेपकाचा वापर व नियंत्रण त्यांचे नियमन व मार्ग निश्चित करता यावेत, याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 व त्यात समाविष्ट असलेल्या पोट कलमाचा नियमन आदेश जारी करण्यात आला आहे. 

सदरचा आदेश हा दिनांक 20 एप्रिल2021 रोजी मध्यरात्री बारा वाजले पासून ते दिनांक 21 एप्रिल, 2021 रोजीचे मध्यरात्रीपर्यंतअमलात राहिल असे पोलीस अधीक्षक  मनोज पाटील यांनी  कळविले आहे.
close