shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवनचे सुंदर कुसाळकर यांची इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड..!!

भिगवनचे सुंदर  कुसाळकर यांची इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड..!!
 उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जनतेतून कुसाळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुका  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवा ,जेष्ठ यांच्या नियुत्या बारामती येथे  नुकत्याच करण्यात आल्या . 
यामध्ये प्रामुख्याने इंदापूर तालुक्यातील अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष तसेच मानवी हक्क संरक्षण समिती इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून काम करणारे भिगवण येथील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते सुंदर दगडू कुसाळकर यांची इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली .
नियुक्तीचे पत्र इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष भिसे यांच्या हस्ते देण्यात आले ही नियुक्ती ॲड.  सुधीर पाटसकर (उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य),ॲड पोपटराव सुर्यवंशी(उपाध्यक्ष पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना),ॲड निलेश वाबळे
(अध्यक्ष बारामती तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना) व सहचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र राज्य
,प्रदिप रकटे(उपाध्यक्ष इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना) व कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांच्या मार्गदर्शनाखाली झाले . यामध्ये   हनुमंत जाधव रा. भाडलवाडी यांची  इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना अध्यक्ष तर कपिल युवराज लांडगे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिगवन शहर अध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी संतोष जाधव मनसे सदस्य व संतोष कुताळ भादलवाडी मनसे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते .

कुसाळकर  आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, तालुक्यातील जनतेसाठी विविध योजना त्यांना मिळवून
देण्यासाठी हि संघटना निश्चितच आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरेल, व सर्व सामान्यांची बाजू घेतली जाईल. दरम्यान सत्तेचे विकेंद्रीकरण करणे, हि महत्वाची बाब आहे. यासाठी भविष्यातील इंदापूर तालुक्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवेल, असेही कुसाळकर यांनी सांगितले.त्याचबरोबर
इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावागावात पोहचविण्याचा आमचा मानस असल्याचे नियुक्ती नंतर कुसाळकर यांनी सांगितले .
close