नगर :- प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील मठ्ठपिंप्रि येथे कोरोना बाधीताचा आकडा वाढतच चालला असुन शुक्रवार (दि.९) झालेल्या रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये २२ रुग्ण बांधीत आढळून आले.या मध्ये एकुण ९८ लोकांची तपासणी करण्यात आली.या मध्ये रुईछत्तीसी २, मठपिंप्रि १२,हाताळणं १ ,सांगवी ४ ,वाटेफळ १ ,लोणी सय्यदमिर २ ,असे मिळुन एकुण २२ जण पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले या आधी साकत या ठिकाणी १३ रूग्ण बांधीत आढळले दोन दिवसा नंतर दहिगवा या ठिकाणी ३७ बांधीत रुग्ण आढळुन आले होते. या आधीचे रुई, साकत दहिगाव खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
कुटुंबातील अनेक सदस्य मित्र यांना यांचा प्रसाद मिळाल्याने बांधीत रुग्ण ची संख्या मोठ्या प्रमाणावर वाऱ्यासारखी वाढतच चालली आहे.यातील काही बांधीत रुग्णांना त्रास जाणवत नसल्याचे रुग्ण स्पष्ट सांगत आहे.रॅपिड अटीजन शिबीर यशस्वीतेसाठी नगर पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र भापकर, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, वैद्यकीय अधिकारी एस.ए ससाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.हिवाळे संदिप भालसिंग,आशा सुपरवाझर विजया लंके, रुई उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी सविता ससाणे, परिचारिका आरती कसबे, अंगणवाडी सेविका शोभा सांगळे,आशा सेविका अंजना नवसुपे, ग्रामसेवक यवले भाऊसाहेब, संरपच हाऊसराज नवसुपे, उपसरपंच सरस्वती उकाडे,कँप यशस्वी होण्यासाठी आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
नगर तालुक्यातील जास्तीत जास्त गावात रॅपिड ॲटीजेन स्टेट घेण्याचा प्रयत्न आहे. कोरोना बांधीत रुग्णांना कोणत्याही ठिकाणी खाजगी, सरकारी हाॅस्पिटल मध्ये किंवा कोविड सेंटर ,बेड,ईतर कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मला चोवीस तास कधी फोन करा व आपल्या योग्य ती मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.मोबाईल नंबर.9975454441
नगर पंचायत समिती माजी उपसभापती- रविंद्र भापकर

