shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रा. तायाजी लोंढे यांचा पीएच. डी. निमित्त सत्कार

माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रा. तायाजी लोंढे यांचा पीएच. डी. निमित्त सत्कार
इंदापूर प्रतिनिधी:
बावडा येथील श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटी संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक तायाजी तुकाराम लोंढे (रा. लासुर्णे,ता. इंदापूर) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखे अंतर्गत हिंदी या विषयामध्ये पीएच. डी संशोधन केंद्र चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर मधून पीएच. डी.पदवी प्राप्त झाली आहे.
      प्रा. तायाजी लोंढे हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रथम पदवीधर असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी "हिंदी की दलित कहानियों का समाजशास्त्रीय अध्ययन " या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कॅम्प येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. जालिंदर इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. 
   प्रा.तायाजी लोंढे यांनी पीएच. डी पदवी प्राप्त केल्याबद्दल  महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर, नेताजी लोंढे, तानाजी लोंढे, सिध्दार्थ लोंढे, संदेश लोंढे, बाबा जाचक , गजानन वाकसे, सोमनाथ भोसले, महेश लोंढे, सिद्धी जगताप, मल्हारी गायकवाड, लोदाडे सर, निंबाळकर सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
close