shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आईने अभ्यास कर म्हणत टीव्ही बंद केल्यामुळे विद्यार्थ्याने केली आत्महत्या..!!

केज शहरातील  घटना.!! 
प्रकाश मुंडे । केज, जिल्हा प्रतिनिधी:- 
आईने टिव्ही पाहत असलेल्या मुलास अभ्यास कर असे म्हणत टीव्ही बंद केला या कारणाने १८वर्षीय विद्यार्थ्याने घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज शहरातील वकीलवाडी परिसरात शनिवार दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.


केज शहरातील वकील वाडी परिसरात अनंत कोकीळ हे वास्तव्यास आहेत त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे त्यांचा मुलगा चैतन्य अनंत कोकीळ वय १९ वर्ष हा अहमद नगर येथे वेदांत वेद विद्यालयात गेल्या पाच वर्षांपासून वेद शास्त्राचे शिक्षण घेत होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने तो केज येथे घरी आला होता.

शनिवारी सकाळी त्याने आँनलाईन अभ्यास केल्या नंतर तो घरातील टीव्ही झोपून पाहत असल्याने त्याच्या आईने त्यास टीव्ही नीट बसून पाहा व अभ्यास कर असे म्हणत टीव्ही बंद केला.

टीव्ही आईने बंद केल्याने चैतन्य हा दुसऱ्या खोलीत जाऊन त्याने घराचे दार बंद करत घरातील छतास गळफास घेऊन आत्महत्या केली .
चैतन्य कोठे गेला याचा शोध आई व बहीण घेत असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या बहिणीला दिसून आले.

केवळ आईने अभ्यास कर म्हणत टिव्ही बंद केल्याने १९ वर्षीय चैतन्य अनंत कोकीळ या वेद शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने  शहरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात होती.

सायंकाळी सहा वाजता त्याच्यावर क्रांती नगर येथील स्मशाभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले .
close