प्रकाश मुंडे ।केज जिल्हा प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यात कोरोना संक्रमण काळात अनेक ठिकाणी कोविड सेंटर (CCC )व डेडिकेटेड कोविड सेंटर (DCHC) सुरू करण्यात आले होते या ठिकाणी अनेक पदे भरण्यात आलेली होती परंतु या पदावर नियुक्त करण्यात आलेले आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मरचारी, स्टाफ नर्स,प्रयोगशाळा सहाय्यक ,डेटा इन्ट्रॅ ऑपरेटर व इतर संबंधित कर्मचारी हे नियमबाह्य पद्धतीने भरलेले आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करून संबंधितांची चौकशी करून नियमानुसार पात्र अर्जदारास नियुक्त्या द्यावयत अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाअध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर यांनी केली आहे.
या बाबत त्यांनी अशी मागणी केली आहे की गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये कोरोना चा वाढत प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने उपसंचालक आरोग्य विभाग लातूर यांनी वेगवेगळ्या पदांसाही जाहिरात प्रसिद्ध केली होती व पात्रतेनुसार अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार पात्र अर्जदारांची गुणवत्ता यादी सर्व जिल्ह्याला पाठवण्यात आल्या होत्या तशीच यादी बीड,येथील जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, व जिल्हाशल्यचिकित्सक बीड यांना देण्यात आल्या होत्या व रुग्णांच्या संख्येनुसार संबंधित यादीतील अर्जरदारांना वेगवेळ्या पदांसाठी आवश्यकतेनुसार नियुक्त्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु बीड जिह्यात बहुतांश ठिकाणी उपसंचालक आरोग्य विभाग लातूर यांनी दिलेल्या पात्रता यादीतील पात्र अर्जदारांना नियुक्त्या न देता नियमबाह्य नियुक्त्या देऊन पात्र आर्जदारांवर अन्याय करण्यात आला असून याची चौकशी करून या नियुक्त्या कोणी दिल्या ? कोणत्या नियमाने दिल्या ? यामध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार झाला का ? याची चौकशी करण्यात यावी व या वर्षी दिलेल्या पुनर्नियुक्त्या रद्द करून पात्र अर्जरदारांना नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी डॉ वासुदेव नेहरकर यांनी मा.जिल्हाधिकारी बीड ,आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य,मुंबई व मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

