shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

‘महाराष्ट्रातील परिवर्तन’ या विषयावर प्रसिध्द कवी अशोक नायगावकर यांचे व्याख्यान..!!

नवी दिल्ली: महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रसिध्द  कवी, लेखक अशोक नायगावकर हे  उद्या २ एप्रिल २०२१ रोजी ‘महाराष्ट्रातील परिवर्तन’ या विषयावर १५ वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. १ एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या पंधराव्या दिवशी अशोक नायगावकर दुपारी ४.०० वाजता  विचार मांडणार आहेत.

अशोक नायगावकर यांच्या विषयी
अशोक नायगावकर यांची हास्यकवी म्हणून ख्याती आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये ३१ वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. १९९३ मध्ये ‘वाटेवरच्या कविता’ हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला, या संग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसूत पुरस्कार’ प्राप्त झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीतही त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी सिंगापूर मध्ये आयोजित विश्व मराठी काव्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. १४ व्या आणि १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

‘कवितांच्या गावा जावे’ व ‘हास्यधरा’ या कार्यक्रमात त्यांचा सहभाग राहिला आहे. दैनिक लोकसत्तामध्ये  ‘हास्यरंग’ पुरवणीचे ते दीर्घकाळ अतिथी संपादक होते व त्यांनी या पुरवणीत विविध सदरांमधून लिखाण केले. विविध दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी साहित्यिक योगदानासाठी त्यांना कुसुमाग्रज गौरव विशाखा पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार, जगदगुरु तुकाराम व आद्यकवि मुकुंदराज पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे.

शुक्रवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण 
शुक्रवार,  2 एप्रिल 2021 रोजी  दुपारी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
close