▶️श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे वीज तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत चार एकर ऊस व ठिबक सिंचन संच जळून खाक झाला आहे.
🧐टाकळीभान परिसरातील घटना
टाकळीभान येथील कारेगाव रस्त्यालगत गट नंबर २०३ मध्ये द्वारकाबाई नामदेव वाघुले यांचा ठिबक सिंचन केलेला अडीच एकर ऊस व आप्पासाहेब नामदेव वाघुले यांचा दिड एकर ऊस आहे. वीज तारांच्या झालेल्या घर्षणामुळे ठिणग्या ऊस पिकात पडल्याने ऊसाने पेट घेतला, व क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे चार एकर ऊस व ठिबक सिंचन संच आगीत जळून खाक झाला.
🔥आग विझवण्याचा केला प्रयत्न
ऊसाने पेट घेतल्याचे दिसून आल्यावर वाघुले कुटुंब व परिसरातील शेतकर्यांनी ऊसाकडे धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत अशोक कारखान्याच्या अग्नीशमन बंबला पाचरण करण्यात आले. मात्र तोपर्यंत सारा ऊस जळून खाक झाला होता.

