shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणडोहो शाळेतील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश..!


प्रतिनिधी । शिवा म्हस्के :
Scert पुणे आणि जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग यांच्या विद्यमाने बालदिनाचे औचित्य साधून ऑनलाइन विविध गुणदर्शन स्पर्धा  सन 2020/21 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना कोणतेही व्यासपीठ मिळत नव्हते ते व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.
               कु.ईश्वरी अर्जून साठे

ही स्पर्धा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील शाळांसाठी घेण्यात आली यामध्ये तालुकास्तर आणि जिल्हास्तर राज्यस्तर अशा पातळीवर ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावी चे विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये वक्तृत्व, कविता वाचन, पत्रलेखन , बाल साहित्य संमेलन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
विद्यार्थ्यांनी ज्या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याचा व्हिडिओ तयार करून शिक्षकांना पाठविणे व शिक्षकांनी तो व्हिडिओ फेसबुक, ट्विटर वर baldivas2020# या hashtag द्वारे स्पर्धेच्या आयोजकांकडे पाठविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते.
                 आयुष अनिल गवळी

या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा नारायणडोहो या शाळेतील सर्वच इयत्ता मधील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ईश्वरी अर्जुन साठे इयत्ता तिसरी या विद्यार्थिनीने वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला तर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवला तसेच आयुष अनिल गवळी इयत्ता पहिली या विद्यार्थ्याने याच स्पर्धेत तालुकास्तरावर तृतिय क्रमांक मिळवला.

जिल्हा परिषद शाळा नारायणडोह शाळेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री  चंद्रकांत सोनार, केंद्रप्रमुख माननीय श्री सूर्यभान काळे,सरपंच सविताताई किशोर गायकवाड,उपसरपंच पोपटराव बनकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र साठे,शिवाजी साठे यांनी अभिनंदन केले आहे 
या स्पर्धेच्या तयारीसाठी मुख्याध्यापक संतोष ढगे, राजू सोनवणे, गोविंद सुपेकर, प्रियंका खांदवे यांनी परिश्रम घेतले. सर्व पालकांनीही मोलाचे सहकार्य केले.


close