सावेडी । प्रतिनिधी :सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील ज्ञानसंपदा शाळेसमोर पाण्याच्या वॉल गळतीमुळे दुषित पाणी पुरवठा होत असून पालिकेने सदर वॉल त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अगोदरच कोरोना सारख्या आजाराने जगात थैमान घातलेले आहे. असेअसताना या भागात पिण्याचे पाणी मात्र दुषित येत आहे .परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक अनेक आजारांनी त्रस्त होत आहेत.
पाण्याच्या गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून रस्त्यातील खड्ड्यांमधे चिखल झाला आहे. या रस्त्याने दिवसभरात शेकडो वाहने ये-जा करतात त्यामुळे या खड्ड्यातील पाण्याने काही वेळा अपघात ही होत आहेत. सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम लॉकडाउन मूळे बंद आहे परिणामी यावरून मार्गक्रमण करताना अपघा ताला निमंत्रण मिळत आहे .
पालिकेने याची दखल घेवून सध्यातरी लवकरात लवकर वॉल दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .

