shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना(लाँकडाऊन) जनसामान्यांच्या विविध समस्या-शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील..!


अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा...!!! संपूर्ण देश कोणाविरुद्ध लढत असताना त्यामध्ये योगदान देणाऱ्या सर्वच कोरोना योद्ध्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व तमाम देशवासियांच्या वतीने ऋण व्यक्त करतो, मागील चौदा दिवसात देशात 23 लाख 2हजार 494 नवीन केसेस आढळून आले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 8 लाख 17 हजार 184 नवीन केसेस आढळून आले आहेत. 

शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील, संस्थापक/प्रदेशाध्यक्ष,
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य

देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा विचार करता जवळपास एक तृतीयांश पेक्षा जास्त केसेस या एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत.अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कोरोना लस तयार होत असताना सुद्धा पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्हे रेड झोन मध्ये येत असतील तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं न पटणारी आहे. औषधांचा कृत्रिम तुटवडा तर निर्माण केला जात नाही ना हा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे कोरणा रुग्णांची होणारी आर्थिक लूट आणि औषधांचा काळाबाजार यातून जनसामान्यांना मुक्तता मिळेल का? हाच प्रश्न सतावत आहे.


अवकाळी पाऊस गारपीट त्यापाठोपाठ कोरोना आणि लॉक डाऊन या अस्मानी-सुलतानी संकटांनी बळीराजा पुर्णपणे भुईसपाट झालेला आहे.
बळीराजा उन्हातान्हात काबाडकष्ट करणार, रक्त आटवणार आणि त्याच शेतीमालाचे भाव एसीत बसणारा साहेब ठरवणार ही कुठली प्रक्रिया आहे? 
शेतात पिकवलेल्या शेतीमालाचे भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नसावा यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्टच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे पण कृषिप्रधान देशाचा कणा म्हणजे बळीराजाच जर अडचणीत असेल तर कृषिप्रधान भारत देश कसं म्हणायचं?
*अवकाळी पाऊस गारपीट कोरोना  आणि लॉक डाऊन या सर्व प्रसंगांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष प्रकारची मदत होण्यासाठी आणि कोरोना महामारी चा सामना करण्यासाठी शेतकरी बांधवांना विशेष पॅकेज जाहीर करावे.*

पिक कर्जाविषयी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी दिली त्या बद्दल हार्दिक अभिनंदन, पण जे शेतकरी नियमित कर्जफेड करण्यासाठी   सोनं-नानं गहाण टाकणे, पशुधन विकणे त्यातुन पूर्तता झाली नाही तर पर्यायाने खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन बँकांची परतफेड वेळेवर करून आपली पत राखतो, त्यावर नेहमीच अन्याय का?
 महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान रुपये 50000 देण्याचे मान्य केले होते त्या रकमेची सरकारदरबारी तरतूद होऊन तातडीने त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात यावेत.

सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आर्थिक संकटात सापडला असून सध्याचे पीक कर्जाचे हप्ते म्हणजेच एप्रिल, मे,जून-2021 ला देय असतील अशा पीक कर्जाच्या हप्त्यांचे फक्त व्याज जमा करून त्या शेतकऱ्यांना नियमित कर्जदार करून घ्यावे, ही विनंती.

घरगुती वीज बिलासंदर्भात खूप साऱ्या तक्रारी ग्राहकांकडून येत असताना महावितरण कडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, घरगुती विज बिल जे ग्राहक नियमित भरतात अशा ग्राहकांना एक महिन्याचे लम-सम विज बिल 35000, 50000, 60000 अश्याप्रकारे  ग्राहकांना मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे अशा तक्रारींचा तातडीने निपटारा करून ग्राहकांना न्याय द्यावा.

कोरोना लसीचा निर्माण झालेला हा तुटवडा लक्षात घेता, शेतकरी पुत्र म्हणून एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते कोरोना लस जर आमच्या बळीराजाच्या शेतात तयार झाली असती ना तर बळीराजाने समाजहितासाठी ती विनामूल्य उपलब्ध करून दिली असती.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत-मास्क/सॅनिटायझर वापरा, आपली, आपल्या परिवाराची, समाजाची काळजी घ्या.

🚩जय जिजाऊ... 
🚩जय शिवराय... 
🚩जय शंभुराजे...

शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील,
संस्थापक/प्रदेशाध्यक्ष,
🚩शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य🚩
मो.९५७९७४५७७४
close