राज्यात अक्षरश: लोकं मोठ्या प्रमाणात मरताहेत आणि राज्यातील नेते मंडळी ( सर्वच पक्षांची ) राजकारण करण्यात धन्यता मानताहेत हे दुर्दैव..! कुणी केंद्र सरकारच्या नावाने गळे काढतय तर कुणी राज्य सरकारच्या नावाने खडे फोडतयं, काय चाललंय ते कळायला मार्गच नाही..; कधी , कधी तर असं वाटतं की, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी खरंच सत्तेतुन पायउतार व्हावं आणि भाजपकडे एकदाची सत्ता देऊन टाकावी म्हणजे सगळं गढुळ झालेलं राजकीय वातावरण निवळेल.
कुणालाच जनतेच काहिच देणंघेणं नाही असेच सर्वजण वागताहेत . कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की , राज्य सरकारच्या अडचणी वाढतील , जनतेचा सरकारवरील रोष वाढेल व त्याचा फायदा आपल्याला होईल या विचारात विरोधीपक्ष दंग आहे.तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार कुठलीच मदत करत नाही असं वारंवार सांगुन एकदाचं केंद्र सरकारवर कसं खापर फुटलं आणि त्याचा आपल्याला कसा राजकीय लाभ होईल.
या विचारात राज्य सरकार दिसतंय ,आता काय म्हणावं या राजकारण्यांना कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा , कुठे गेले शाहु , फुले , शिवराय , आंबेडकरांचे विचार की ते फक्त आता लोकांनी भाषणातच ऐकायचे का ? "अरे राज्यातील जनता वाचली तरच तुमचं राजकारण जिवंत राहिल ना ! " ऐवढा अन्याय , अत्याचार का करता लोकांवर कधीतरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोन ठेवून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करा रे बाबानों !
"अक्षरशः कुटुंब ची कुटुंब उद्ध्वस्त होताहेत, वैद्यकीय सेवेचा अक्षरशः बाजार मांडलाय, प्रचंड सर्वसामान्य जनतेची लुट होतेय लुट ..;गल्ली ते दिल्ली सर्व यंञणा सदोष आहेत."
सर्वजण एकमेकांची पाठराखण करताहेत राज्यकर्त्यांना हि त्यांचा मलिदा घरपोहोच होतोय अतिशय भिषण आणि विदारक चित्र दुर्देवाने छञपतींच्या महाराष्ट्रात बघायला मिळतंय कुणी ऑक्सिजन नाही म्हणुन तडफडून मरतोय तर कुणी बेड मिळत नाही म्हणुन दम तोडतोय " रेमडेसिवीर " चा तर अक्षरशः आम्ली पदार्थांपेक्षा हि मोठा काळाबाजार सुरू आहे. हे चिञ पाहुन मन विष्णन होतयं , महाराष्ट्रातील जनतेला कुणीच वाली नसल्याचेच एकदंरीत सिध्द होतंय सामान्यांची होणारी ससेहोलपट , हाल व आक्रोश आता खरंच बघवतं नाही.
म्हणुनच राज्याच्या राज्यकर्त्यांना सांगावस वाटतं की , "एक तर तुम्ही सत्ता सोडुन भाजपाच्या हवाली करा नाही तर त्यांना सत्तेत घ्या, पण तुमच्या एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात राज्यातील जनतेचा बळी माञ देणं आता तरी थांबवा."
गणेश जगदाळे (पत्रकार)
मो : ८००७४२६२७९

