हिंदु धर्मिय कोरोनाग्रस्त भगीनीच्या
अंत्यविधीस मुस्लिम बांधवांचा पुढाकार !
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर हे पुर्वीपासूनच हिंदु, मुस्लिम एकतेचे प्रतिक आहे हे राज्यभर सुपरिचित आहे, याचे आणखी एक ज्वलंत उदाहरण आज पुन्हा बघावयास मिळाले,त्याचे झाले असे की, येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये एका हिंदु धर्मिय भगीनेचे आपल्या राहत्या घरातच कोरोनाने निधन झाले, मात्र शेजारी व परिसरातील तीचे कोणीही नातेवाईक वैगरे नाही,
हे जेव्हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक नजीरभाई मुलानी यांना माहित पडले त्यांनी तात्काळ आपल्या समाजातील मित्र,तरुणांना सांगीतले,यावर कोणताच विलंब न करता परीसरातील मुस्लिम बांधव एकत्र जमले आणि या हिंदू भगीनीस अंत्यविधीसाठी अमरधाम (स्मशानभूमी) मध्ये घेऊन गेले,अशा प्रकारे शहरात पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन घडल्याचे बघावयास मिळाले.
कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीला जेथे रक्तातील नाते नकार देत असताना, इतर सामाजातील लोकांनी पुढाकार घेऊन अंत्यविधी करावी यापेक्षा मोठे माणूसकीचं नाते ते काय ? अशी परीसरात चर्चा होत आहे, खरोखरच श्रीरामपूर शहर हे हिंदु, मुस्लिम एकतेचे प्रतिकच असल्याचे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले.

