shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हेमंतभाऊ शेजवळ म्हणजे शिर्डी परीसराच्या पत्रकारीता क्षेत्रातील एक "अनोखी अदा"..!!



शिर्डी शहरातील पत्रकारीता क्षेत्रात निर्पेक्ष तथा परोपकाराची भावना मनी ठेऊन पत्रकारीता करणारे हेमंतभाऊ शेजवळ हे अल्पावधीतच सुप्रसिद्ध झाले आहे,त्यांची सर्वाना समजून घेण्याची तथा मान देण्याची कार्यपद्धती खरोखरच सगळ्यांपेक्षा वेगळी आहे,
नेहमी हस्तमुख सदासर्वदा आनंदी राहणारी ही व्यक्ती नेहमीच सर्वांचा आदर सन्मान करीत असल्याचे सातत्याने बघावयास मिळते,


महत्वाचा मुद्दा असा की ते जेव्हा बातमी घेण्यासाठी संबधीत ठिकाणी जातात तर प्रथम तेथील तथ्य,सत्य जाणून घेतात,उगच कळते आणि समजतेच्या नादी लागण्यापेक्षा खरी वस्तूस्थिती जाणून घेतात आणि मगच बातमी करतात ही त्यांच्या बातमीतील खास विशेष शैली होय,म्हणून ते सर्वांनाच हवेहवेसे तथा आपलेसे वाटतात,इतर अनेकही पत्रकार बंधू-भगीनी देखील आहेत या क्षेत्रामध्ये त्यांचंही कार्य खुप चांगलं आहे,ते देखील उत्कृष्ठरित्या पत्रकारीता करतातच मात्र हेमंतभाऊ शेजवळ हे पत्रकारीतेलाच आपली भक्ती मानुन सदैव त्यातच रममाण असतात, म्हणून त्यांची पत्रकारीता क्षेत्रातील अदा जराशी अनोखी आहे,आणि यामुळेच शिर्डी शहरासह परीसरात त्यांनी आपल्या या कार्यशैलीमुळे अल्पकाळातच मोठे नावलौकिक मिळविले आहे ते केवळ श्रीसाईबाबांचा आशिर्वाद आणि आपल्या कार्य गुणांमुळेच अशा या निर्पेक्ष वृत्तीच्या पत्रकाराची पत्रकारीता यापुढेही अशीच तळपत,उजळत रहावो ही सदिच्छा 💐

- शौकतभाई शेख (प्रदेशाध्यक्ष)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)
close