shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जादा बिले आकारल्यास करणार कारवाई ; अटी व शर्तींची करावी कडक अंमलबजावणी - तहसीलदार कुंदन हिरे


पोलीस प्रशासन ही सज्ज ; - पोलीस उप विभागीय अधिकारी संजय सातव

शिर्डी (प्रतिनिधी) :- राहाता तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठी झपाट्याने वाढत असल्यामुळे कोरोणाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राहाताचे तहसीलदार कुंदन हिरे स्वतः राहाता तालुक्यात रात्रंदिवस मोठी मेहनत घेऊन प्रयत्न करीत असून राहताचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल शिर्डीत स्वतः फिरून शिर्डीतील अनेक हॉटेल, लॉजिंग, दवाखाने, लॅब मध्ये जाऊन त्यांची तपासणी केली.

येथे कोरोणा संदर्भातल्या अटी व शर्तींचा भंग होतो की काय?याची पाहणी केली तसेच सर्व हॉटेल लॉजिंग, दवाखाने यांना कोरोना संदर्भातला अटी व शर्तीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या , जर कोरोनाच्या  संदर्भातल्या अटी व शर्ती पाळल्या नाहीतर कडक कारवाई करण्याचा इशाराही तहसीलदार कुंदन हिरे यांनी या हॉटेल ,लॉजिंग ,दवाखाने ,खाजगी  लॅब यांना दिला आहे, व कोणत्याही खाजगी लॅबमध्ये तपासणी करताना किंवा दवाखान्यामध्ये कोणी ठरवून दिलेल्या बिलापेक्षा रुग्णांकडून जादा आकारणी केली तर तशी तक्रार संबंधित रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी करावी.त्या दवाखान्यावर  किंवा लॅब वर सक्त कारवाई गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले आहे.

राहाता तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे ,जिल्ह्यामध्ये राहाता तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या मोठी असल्यामुळे राहाता तालुक्यात कोरोणा संदर्भातल्या अटी व शर्ती चे पालन हे नागरिकांनी काटेकोरपणे करावे, अन्यथा अशा नागरिकांना वर कडक  कारवाई करण्यात येईल असा इशारा राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे. राहता तालुक्यामध्ये सहा ठिकाणी खाजगी 100 बेड चे कोरोणा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे, या ठिकाणी कोरोणा बाधित रुग्णांची उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात  आली आहे.

 मात्र या ठिकाणीही या खाजगी दवाखान्यात रुग्णांकडून अधिक बिले आकरू नयेत, त्याचप्रमाणे खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली जाते त्या संदर्भातही लॅब वाल्यांनी अधिक बिले घेऊ नयेत, शासनाने ठरवून दिलेल्या बिलात किती रक्कम रुग्णांकडून आकारली  तेव्हढीच घ्यावी,अन्यथा अशा खाजगी दवाखाने किंवा लॅब वर शासनामार्फत सक्त कारवाई करण्यात येईल ,असाही इशारा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे ,त्याच प्रमाणे राहाता तालुक्यातील सर्वच ठिकाणी व शिर्डी शहरातही हॉटेल, लॉज व रेस्टॉरंट आहेत, त्यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावयाचे आहे, जर कोणीही उल्लंघन करताना दिसला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, नागरिकांनीही बाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य आहे, तसेच सामाजिक दूरीचे अंतर ठेवले पाहिजे, दुकानदारांनी मास्क वापरून सामाजिक दूरीचे अंतर ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा दुकानदारांवर ही दुकाने बंद करण्यासारखे पाऊल उचलले जाईल रात्री आठ नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीचे जमावबंदी आदेश लागू आहे पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये तसेच लग्न समारंभ अंत्यविधी व इतर समारंभासाठी गर्दी करू नये.

राहता तालुक्यातील सर्व नागरिकांनी अटी व शर्ती यांची काटेकोर अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे ,अन्यथा उल्लंघन करणाऱ्या अशा नागरिकांवर नाविलाजाने अधिकाधिक कडक कारवाई केली जाईल राहाता तालुक्यात कोरोना बाधितांचे संख्या झपाट्याने वाढत आहे त्याला कारण नागरिक कोरोनाचे नियम व अटी पाळत नाहीत, त्यामुळे यापुढे कोणीही असो कोरोणाच्या अटी व शर्तींचा उल्लंघन केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल ,असा इशाराही तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे.
close