shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न करणार - खा. सदाशिव लोखंडे


शिर्डी( प्रतिनिधी),:
शिर्डी लोकसभा मतदारसंघात  कोरोना प्रतिबंधक लस कमी पडू देणार नाही. त्याचप्रमाणे रेमडीसिव्हर इंजेक्शनचा साठा करणाऱ्या साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी ,शिर्डी येथे सांगितले .

शिर्डी येथे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज रविवार दिनांक 4 एप्रिल रोजी कोव्हीड केअर सेंटर संदर्भात आढावा घेतला ,यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, शिवसेनेचे कमलाकर कोते ,तालुका अध्यक्ष संजय शिंदे ,शहर प्रमुख सचिन कोते तसेच डॉक्टर प्रीतम वडपावे हे बरोबर होते.
 शिर्डी येथे कोव्हीड केअर सेंटर मध्ये काम करणारे कर्मचारी हे संस्थांनचे कर्मचारी असून स्वच्छता तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्स, यांना राहण्यासाठी द्वारावती येथे व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थान च्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत कोरोणा प्रतिबंधक लस देण्यात यावी .असेही साई संस्थांनच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना संस्थान कर्मचाऱ्यांच्या मागणी मुळे सांगितल्यां चे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले असून कोरोणा काळात नागरिकांनी कोरोनाच्या अटी व शर्तींचे पालन करावे व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. 

यावेळी खासदार लोखंडे यांनी कोरोणाच्या वाढत्या बाधित रुग्णां संदर्भात आढावा घेतला व कोरोणाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी येथे यासाठी काय प्रयत्न करता येईल यासंदर्भात चर्चा केली तसेच येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये त्रुटी व सुविधा याबाबतही चर्चा केली.येथिल त्रुटी सुधारण्यासाठी येथील अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या.
close