shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त रक्तदान करून महामनावास अभिवादन..!!

प्रकाश मुंडे ।‌ केज जिल्हा प्रतिनिधी :- 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त LFC ग्रुप मिलींद सागर युवा प्रतिष्ठान फुले आंबेडकर नगर व हाऊसिग कॉलनी केज च्या वतीने रक्तदान शिबीराचे अयोजन फुले नगर केज येथे केले होते.                 


या कार्यक्रमाचे उद्‌घाटक जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुनभाई इनामदार सिताताई बनसोड मॅडम पत्रकार हांडिबाग सर प्रा.धनराज भालेराव सर सुदेश सिरसट सुमेध शिंदे अशोक गायकवाड बालासाहेब जोगदंड प्रा धम्मपाल गायकवाड यांनी प्रथमता महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन, अभिवादन करून करण्यात आले.                              

सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन करताना मा. हारूनभाई इनामदार यांनी महामानवाची जयंती हि १८ तास वाचन करून अभिवादन करून साजरी करावी असे सांगन्यात आले. या शिबीरास अजय भांगे सर बालासाहेब जोगदंड सर लहु जाधव ऋषिकेश सोनवणे प्रेम मस्के केतन घोडके वैज्यनाथ पौळ दिपक धिवार अशोक धिवार आकाश पौळ अमोल हातागळे सुमेध भालेराव निखिल समुद्रे आकाश लांडगे दिपक लांडगे नेहार भालेराव चेतन मस्के यांनी रक्तदान केले सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचाल अजय भांगे सर यांनी केले तर आभार अशोक गायकवाड यांनी मानले.
close