राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जानकर कुटुंब यांची भेट घेऊन केले सांत्वन..!!
राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांची शनिवारी (दि.3) रोजी पळसावडे (ता.माण) येथे भेट घेऊन सांत्वन केले. महादेव जानकर यांच्या मातोश्री श्रीमती गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे बुधवारी निधन झाले.त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री भरणे यांनी जानकर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील ही उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे यांनी श्रीमती गुणाबाई जानकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. मातोश्रीच्या निधनामुळे जानकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती जानकर परिवाराला मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी महादेव जानकर व त्यांचे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

