shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे शिल्पकार.. डॉ.प्राचार्य माधवराव फावडे..!!

प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी :- 
नव्वदच्या दशकात केज सारख्या ग्रामिण भागात गोर गरीब विद्यार्थ्यांना  उच्च शिक्षण मिळावे म्हणुन वसंत वरिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात  माजी  आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांनी केली.कला ,वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखा सुरु करुन प्रामुख्याने या भागातील विद्यार्थ्यांना न्याय दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांपैकी या  वसंत महाविद्यालयाने गेल्या सत्ताविस वर्षात प्रगतीची गरुडझेप घेतली आहे. या झेप घेण्यामागे प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे यांची सकारात्मक भुमिका महत्वाची ठरली असेच म्हणावे लागेल. 
       

1990 मध्ये 186 विद्यार्थी घेवुन वसंत महाविद्यालय सुरु करण्यात आले.आज या महाविद्यालयात 1800 विद्यार्थी कला ,वाणिज्य व विज्ञान शाखेत अध्ययन करत आहेत.माजी आमदार लोकनेते स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या ह्दयात असलेल्या तळमळीतुन महाविद्यालयाची जडणघडण झाली आहे.त्यांचाच वैचारिक व शैक्षणिक वारसा असलेले त्यांचे सुपुञ ),अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व संस्थेचे सचिव मा.रमेशराव आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय मार्गक्रमण करत आहे. माजी आमादार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या स्मृती जपण्यासाठी वसंत महाविद्यालयाचे नांव बदलुन बाबुरावजी आडसकर महाविद्यालय असे करण्याचा आग्रह प्राचार्य डॉ.फावडे यांनी धरला व तो पुर्णही केला. 

संस्थेच्या मालकीची सात एकर जागा असुन त्यावर दुमजली प्रशस्त इमारत ,सुसज्ज ग्रंथालय ,क्रीडा विभाग ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग या सह पंचविस वर्ग खोल्या आहेत.युजीसी अंतर्गत मुलींचे होस्टेल व तीन एकरचे भव्य क्रीडांगण विद्यार्थ्यांना उपलब्ध केले.
        
केज तालुक्यातील नॕक  पुर्नमुल्यांकन झालेले एकमेव महाविद्यालय असुन महाविद्यालयास बी ग्रेड प्राप्त आहे.तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेचे 2001-2015  आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाले आहे.40 प्राध्यापक व 22 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.काही  प्राध्यापक सेट नेट व  सर्व एम.फिल.व  पीएच.डी.धारक आहेत.उच्च शिक्षणाची गंगा समाजा पर्यंत पोहचावी म्हणुन सर्वच प्राध्यापक कटीबद्ध असुन आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये 650 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.महाविद्यालयातील वनस्पती शास्ञ ,रसायन शास्ञ व इंग्रजी विषयात 18 विद्यार्थी संशोधन करत आहेत.
      
कोणत्याही महाविद्यालयाचा आरसा त्याचे ग्रंथालय असते.ग्रंथालयात 19500 संदर्भ ग्रंथ आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातुन विविध शैक्षणिक विषयावर राष्ट्रीय चर्चा सञे घेण्यात आली होती.या मध्ये वनस्पतीशास्ञ ,रसायन शास्ञ ,मराठी ,हिंदी व इंग्रजी या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांनी चर्चा व मार्गदर्शन केले.
      
सामाजिक सहभागातही  प्राचार्य मागे नाहीत.वृक्ष संवर्धन ,वृक्ष लागवड , पाणलोट बंधारे ,एडस् निर्मुलन रॕली ,मतदार जागृती ,पाणी फाउंडेशनच्या कार्यातही त्यांनी सहभाग  नोंदविला आहे हे विशेष होय. याचाच परिपाक म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  ,औरंगाबाद ने उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट रासेयो कार्यक्रमाधिकारी म्हणुन डॉ.एम.जी.फावडे यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले होते.
       
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गेल्या पाच वर्षापासुन प्राचार्य डॉ.माधवराव फावडे यांच्या माध्यमातुन जवळ जवळ पाचशे नव्या झाडांची लागवड केली आहे.केवळ वृक्षारोपन न करता त्यांचे संवर्धन करुन सर्व परिसर हरित करण्याचे काम केले आहे. प्राचार्य म्हणुन महाविद्यालयाच्या विकासासाठी मा.रमेशराव आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच प्रयत्नशिल असतात.विद्यार्थीकेंद्री महाविद्यालय ही ओळख त्यांनीच निर्माण केली.परिसरातील वनराई  वाढविण्यावर त्यांचा नेहमीच भर आहे.वनस्पतीशास्ञाचे संशोधक मार्गदर्शक म्हणुनही ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद मध्ये ते काम करतात.
 
बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाने शैक्षणिक कामांबरोबरच समाजात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी 2015 ला मा.रमेशराव आडसकर यांच्या स्वागताध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मराठवाडा साहित्य परिषदेचे मराठी साहित्य संमेलन घेवुन माय बोलीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले ही विशेष बाब आहे.
        
माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली  ही  त्यांनी उपप्राचार्य व,प्राचार्य म्हणुन काम करण्याची सुवर्ण संधी लाभली.
    
आज प्राचार्य डॉ.माधवराव फावडे यांचा वाढदिवस...त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा...! भविष्याच्या प्रगतीसाठी ही शुभेच्छा..!
close