सोनईचा उद्याचा रविवारी आठवडा बाजार बंद राहणार..!
सोनई--सध्या दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य रोग वाढतच असल्याने या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून उद्या ( दि.४ रोजी,) रविवारी जनता कर्फ्फु असून या महाभयंकर कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे असून प्रशासन सह प्रत्यक्ष लोकसहभाग महत्वाचा आहे.त्यासाठी भरणारा आठवडे बाजार भरणार नाही,असे ग्रामपंचायत चे सरपंच धनंजय वाघ,यांनी माहिती दिली.
नुकतीच ग्रामपंचायतीच्या सोशल डिस्टन्स द्वारे चर्चा विनिमय करताना जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम विभागाचे सभापती सुनील गडाख,यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच प्रसाद हरकळे, माजी सरपंच ऍड.राजेंद्र बोरुडे,सदस्य नितीन दरदले,सह आरोग्यविभाग,सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ४ रोजी भरण्यात येणारा भाजीपाला, रविवार आठवडे बाजार बंद ठेऊन जनता करफू पाळणार आहे त्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन व नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे ग्रामपंचायत प्रशासन द्वारे करण्यात आले आहे.
नेवासा तालुक्यातील कोरोनाची संख्या वाढत आहे, परिणामी सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे,म्हणून वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे हा रोग बाजाराच्या दिवशी फैलाव रोखण्यासाठी या दिवशी आठवडे बाजार भरणार नाही,शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,ग्रामसमिती,व्यापारी यांनी बाजार सह आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
[ जनता कर्फ्फुसह प्रशासनाने लावलेले निर्बंध नागरिकांकडून धाब्यावर बसवले जात असल्याने जिल्ह्यात, तालुक्यातील कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होत आहे, रोग आटोक्यात आणण्यासाठी त्रास जाणवणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे, संपर्कात आलेल्यानी स्वतःची चाचणी करून घेतली पाहिजे.]
जिल्हा परिषद बांधकाम सभापती- सुनील गडाख

