प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई : मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजने अंतर्गत नव रोजगार निर्मीतीसाठी दिल्या जाणार्या कर्ज प्रकरणाबबत स्टेट बँकेकडून जाणीव पुर्वक टाळाटाळ केले बाबत गेल्या चार दिवसांपासुन स्टेट बँकेच्यादरात चार, दिवसापासुन रामदास क्षीरसागर उपोषणास बसले असुन बँकेच्या प्रशासनाकडून यांची कुठलीही दखल घेतली जात नाही.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कर्यक्रमा अंतर्गत केटरींग व्यवसाय (सेवा उध्योग) नव्याने उभा करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी कर्ज प्रस्ताव दिला होता. मी बँकेचा नियमीत खातेदार असुन मी बँकेकडे प्रस्ताव दिला असता स्टेट बँकेचे व्यवस्थापक सुरुवातीपासुनच माझे कर्ज प्रस्ताव दिरंगाई/दुर्लक्ष करण्याच्या धारणेने अवलंबिले कुठलिही शहानिशा न करता सदर प्रस्ताव त्यांनी नामंजुर करुन पाठविल्याबबत रितसर तक्रार केल्यानंतर बँकेने प्रस्ताव मंजुर झाला असे सांगितलेेेे.
गेल्या चार महिण्यापासून बँकेत हेलपाटे मारत आहे. या बाबत मी जिल्हा आग्रणी व्यवस्थापक यांना उपोषणाबाबत अर्ज दिला असता त्यानी लेखी खुलासा केला क्षीरसागर यांचा क्रेडिट रिपोर्टअसे आहे की ज्या व्यवसायासाठी कर्ज मागणी केली आहे त्यासाठी यापुर्वी १२ लाख रुपये कर्ज घेतलेले आहे.त्यामुळे आपला प्रस्ताव नामंजूर करत आहोत. परंतु मी कुठल्याही प्रकारचे कर्ज या व्यवसायाशी निगडीत घेतलेले नाही. ही माहिती संपुर्ण खोटी आहे. जाणिवपुर्वक माझ्यावर अन्याय केला जात आहे. याची सखोलचौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी. याकरिता मी ३० मार्च पासून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सोनई बाहेर उपोषणास बसत आहे. असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
कोट “ कर्ज मागणी प्रस्ताव सहा-सहा महिने होऊनही प्रलंबीत.
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सोनईचे शाखा अधिकारी तसेच कर्मचारी हे अतिशय उद्दाम पणे वागत असुन सर्व सामान्य खातेदाराना त्रास सहन करावा लागतो. खातेदारांशी आरेरावी करणे, उद्दामपणे बोलने, धमकावने, योग्य माहिती न देणे अशा अनेक तक्रारी आहेत. या कामी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष लक्ष घालुन चौकशी करणे गरजेचे आहे.
विश्वास वैरागर, संस्थापक अध्यक्ष संविधान नायक राष्ट्रीय खाजगी औध्योगीक बँक मल्टीनिधी पतसंस्था सभासद ठेवीदार कर्जदार हक्क अधिकार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
कोट “ रामदास क्षीरसागर यांचा क्रेडिट रिपोर्ट मध्ये ज्या व्यवसायासाठी कर्ज मागणी केली आहे, इतर बँकेकडून त्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेले आहे. सबब आम्ही त्यांचे कर्ज मंजुर करु शकत नाही. त्यानी कोणत्या बँककडून कर्ज घेतले आहे. त्याची त्यांनी चौकशी करावी”
श्री-भावसार, शाखाअधिकारी, स्टेट बँक, शाखा-सोनई

