shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना लॉकडाऊन काळातील इंदापूर तालुक्याच्या कारभारीन -जिजाऊ ब्रिगेडची रणरागिणी प्रा. डॉ. जयश्री भास्कर गटकुळ..!!

कोरोना लॉकडाऊन काळातील इंदापूर तालुक्याच्या कारभारीन -जिजाऊ ब्रिगेडची रणरागिणी प्रा. डॉ. जयश्री भास्कर गटकुळ..!! 
  प्रा. डॉ. जयश्री गटकुळ यांनी जाऊन वृद्ध मंडळींची मोठ्या आपुलकीने विचारपूस केली

इंदापूर प्रतिनिधी:१७ मार्च २०२० पासून covid-19 लाॅकडाऊनचे कडक निर्बंध असल्यामुळे इंदापूर शहरात पोलीस, आरोग्य सेवा पुरविणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशिवाय रस्त्यावर कोणी दिसत नव्हते, कोरोनाची भीती आणि गंभीर परिस्थिती यामुळे  गरीब निराधारांना कोणाचा आधार मिळत नव्हता, अशा वेळी अनेक सामाजिक संघटना मदतीला धावून आल्या, सामाजिक कार्यकर्ते अन्नदान करणाऱ्या च्या घरी जाऊन डबे आणून भुकेल्यांना अन्न पाणी देत होते, 
प्रा. डॉ. जयश्री भास्कर गटकुळ यांनी कोरोना लाॅकडाऊनच्या काळातील  भावनिक शब्दात अनेक आठवणी सांगितल्या ...२ एप्रिल २०२० रोजी रात्री आठ वाजता इंदापूर पोलीस स्टेशन ची एक पोलीस व्हॅन घरासमोर आली आणि तयार केलेले  जेवणाचे डबे पोलीसांच्या हातात दिले त्याच वेळेस माझा विद्यार्थी प्रशांत सिताप तेथे आले आणि म्हणाले आपण बसस्थानकावर जाऊ या हे ऐकून क्षणभर कोरोनाची भीती वाटली पण अशा परिस्थितीत  आपले कार्य थांबवायचे नाही आज आपली खरी गरज आहे या विचाराने बस स्थानकावर जाण्याचा निर्धार केला, माझ्या समवेत माझं कुटुंब विश्वराज गटकुळ, विश्वाबाला गटकुळ,प्रा. भास्कर गटकुळ, प्रशांत सिताफ, पियुष बोरा,सौ. जयश्री खबाले, अथर्व खबाले असे अनेक सामाजिक कार्यकर्ते होते. बस स्थानकावरील भयानक शांतता आणि अनेक निराधार लोक उपाशीपोटी कोणाच्या तरी मदतीच्या प्रतीक्षेत बसलेले पाहून मन हेलावून गेलं, कोरोना लाॅकडाऊनच्या काळात अनेक लोकांचे अतोनात हाल उपासमारी झाली, नोकर्‍या गेल्या, पैसा नाही, कोणी उसने पैसे देऊ शकत नाही, घरात बसून मुलाबाळांचे हाल पाहणे आणि एकीकडे कोरोनाची भीती अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा आम्हाला एखाद्या कुटुंबाला मदतीची गरज आहे हे माहीत होत असे तेव्हा आम्ही आमच्या मित्र परिवारांना किंवा  सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन सर्वतोपरी मदत करीत असत. कोरोनाने माणसाला खूप काही शिकवले, कोरोना ने स्वच्छता, व्यायाम, शिस्त,प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार आणि सहकार्याची भावना या गोष्टी शिकवल्या....आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला गोरगरिबांसाठी काम करायचे आहे आयुष्य थोडे जरी असले तरी एवढ्या कालावधीत खूप खूप मोठं काम माझ्या हातून घडावे हीच माझी सदिच्छा आहे.. अशा भावनिक शब्दात मत व्यक्त केले.
आज दोन एप्रिल २०२१रोजी एक वर्ष पूर्ण झाले तरी प्रा. डॉ. जयश्री भास्कर गटकुळ यांनी कोरोना लाॅकडाऊनच्या काळात नियमांचे पालन करून अनेक सामाजिक कार्यक्रम राबवित कार्य चालू ठेवले, हजारो गरीब -निराधार लोकांना अन्नदान, मोफत भोजन, अनेक सामाजिक संघटनांना आर्थिक मदत, अन्नधान्य वाटप, बालकाश्रम आणि  वृद्धाश्रमातील लोकांना आर्थिक मदत, ऊस कामगार मजुरांच्या मुलांसाठी  कपडे वाटप असे समाजपयोगी कार्य अथक चालू ठेवले, नुकतीच टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथे प्रा. डॉ. भास्कर गटकुळ आणि प्रा. डॉ. जयश्री गटकुळ यांनी जाऊन वृद्ध मंडळींची मोठ्या आपुलकीने विचारपूस केली आणि पाच हजार रुपये आर्थिक मदत गोविंद वृद्धाश्रमचे संस्थापक -अध्यक्ष मा.दशरथ देशमुख यांच्या कडे सुपुर्द केली.जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रा.डॉ. जयश्री भास्कर गटकुळ या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना आणि गरीब लोकांना दानत दाखवणाऱ्या कोरोना लॉकडाऊन काळातील इंदापूर तालुक्याच्या कारभारीन ठरल्या
close