shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे शहरात गुड फ्रायडे निम्मित आज पी पी ई किट चे वाटप..!


पुणे :-आबईस फौंडेशन संचालित अभिमन्यू स्पोर्ट्स अकॅडमी व डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय यांच्या सहकार्याने कोविड 19 महामारी च्या काळात मृत पोसिटीव्ह पेशंट दफनविधी करणाऱ्या अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ ( पुणे शहर टीम ) ज्यांना शासकीय व पूणे महानगरपालिकेचे कोणतेही अनुदान नसताना जीव जीवावर उदार होऊन एक सामजिक भावनेची जाणीव ठेवून पुणे शहरात आत्ता पर्यंत २०० पेक्षा जास्त कोरोना मृत पेंशट दफनविधी चे काम या संस्थे ने केले आहे या संस्थेची गरज लक्षात घेऊन आज गुड फ्रायडे चे निम्मित साधून वरील संस्थांच्या वतीने जवळजवळ सर्व साहित्य सह ३० चे पी पी ई किट चे वाटप आज गुड फ्रायडे चे निम्मित साधून करण्यात आले सदर पी पी ई किट अल्फा ओमेगा ख्रिश्चन संस्थे चे अध्यक्ष ॲन्थोनी वाकडे, सचिव जेरी फ्रान्सिस, संघटक, संतोष शेलार, मनीष पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या हातात सुपूर्द करण्यात आले.

या वेळी बौद्धचार्य रवींद्र जी फणसे, पुणे मनपा चे सुनील डाळिंबे, नागेश लांडगे, मल्लेश पारधे बॉक्सिंग NIS कोच अमोल सोनवणे, राष्ट्रिय मुष्ठी योध्ये बंडू सर गायकवाड, दलित पँथर चे विक्रम कांबळे, दलित सेनेचे शहर अध्यक्ष प्रदीप गायकवाड, राष्ट्रवादी चे गौतम जी सवाने, रेल्वे कामगार नेते दिनकर चिकाटे, सामाजिक कार्यकर्ते अमित मोहिते,भीमाशं संघटनेचे महेश भंडारे, बसपा चे प्रदीप ओव्हाळ महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी अनु जाती विभागाचे उपाध्यक्ष सुजित यादव, सादर कार्यक्रमचे आयोजन अभिमन्यू सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन दयानंद तानावडे यांनी केले तर आभार सचिन पवार यांनी मानले
close