shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार रोहिदास दातीर खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हु मोरे यास १० दिवसांची पोलिस कोठडी..!

राहुरी:- राहुरी येथील पत्रकार श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते.

आरोपी कान्हु गंगाराम मोरे
           

त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

पत्रकार कै.रोहिदास दातीर
            

 तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी  कान्हु गंगाराम मोरे  वय 46  यास नगर औरंगाबाद जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त  येथून  Dy.S.P. संदीप मिटके व त्यांचे पथकाने ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 सरकारी पक्षातर्फे   ॲड. श्री शिंपी व Dy.s.p  संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद  केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून  आरोपीस दहा दिवसाची पोलीस कोठडी दिली . आरोपीच्या बाजूने ॲड.तोडमल व सांगळे यांनी काम पाहिले.
close