शासनाने संचारबंदी लागू केली पण रुग्णाची सोय नाही केली...!
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
नगर शहरात रेमडिसिवर इंजेक्शन चा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल पासून बेड, ऑक्सिजन, रेमडिसेवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.पण कोरोना बांधीत रुग्णासाठी रेमडिसिवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही.
आज नगर शहरात आज मोठ्या प्रमाणावर रूग्ण नातेवाईक या इंजेक्शन साठी शासनाने जाहीर केलेल्या यादीत मेडिकल एजन्सी या ठिकाणी सकाळ पासून तळ ठोकुन आहे. पण आता पर्यंत कोणत्याही रुग्ण नातेवाईकांना इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालया कडुन जो संपर्क क्रमांक जाहीर केले आहे तो सतत वेटिंग वर लागत आहे.लागला तरी रूग्ण नातेवाईकाचे समाधान होत नाही.
बेड साठी संपर्क क्रमांक 02412345460
इंजेक्शन साठी संपर्क क्रमांक 02412320236
पण या इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात नाही.आणि फोन उचलला जात नाही .यात जिल्हा प्रशासन नियोजनात कमी पडताना दिसत आहे.अनेक रूग्ण नातेवाईक लोकप्रतिनिधी हि फोन करत आहेत पण लोकप्रतिनिधी हि प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे.असे सांगून वेळ माऱून नेत आहेत. संध्याकाळ पर्यंत उपलब्ध होणार आहे.असे आश्वासन देण्या पलिकडे लोकप्रतिनिधी ही काहिच करू शकत नाही.खाजगी मध्ये वैद्यकीय अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की कंपनी फक्त दिड हजार इंजेक्शन उपलब्ध करत आहे.नगर शहरात चार हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे काळ्याबाजाराने इंजेक्शन विक्री चालू आहे.
रूग्णाचे नातेवाईकाचे म्हणने असे की रात्री भर पावसात चिंब भिजत असताना अनेक ठिकाणी चौकशी केली पण इंजेक्शन काही मिळाले नाही. त्यांचे सोबत दहा ते बारा व्यक्ती होते. नगर शहरात आता पर्यंत सहा ते सात व्यक्ती फिरत असल्या कारणाने यात अटक हि झाली आहेत.
इंजेक्शनची समस्या प्रशासन कधी सोडवेल.
हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. शासनाचे नियम, कायद्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी किती दिवस करायचा हा प्रश्न रूग्ण ,नातेवाईक विचारत आहेत.
यासाठी प्रशासनाने सामान्य जनतेचा विचार करून रेमडिसीवीर इंजेक्शन ची त्वरीत उपलब्धता करुन दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

