shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वसंत फार्मसी काॅलेज मध्ये निबंध स्पर्धा संपन्न..!!

प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:-  
 वसंत फार्मसी कॉलेज केज येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त ""वसंत फार्मसी कॉलेज"" च्या  वतीने प्राचार्य श्री.थळकरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री.महादेव लांडगे,सौ.चोपणे पी.यांच्या संयोजनातून  निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.     


वेग वेगळ्या विषया वर विध्यार्थीनी निबंध सादर केले होते. 20 जणानी या स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवला होता या  ऑनलाईन  स्पर्धेचे परिक्षण सर्व कॉलेज च्या प्राध्यापक वर्गांने केले आणी सहभागी स्पर्धका मधुन तिन विजेत्यांची  निवड करण्यात आली.                                               

या मध्ये प्रथम येण्याचा मान द्वितीय वर्षातील  कु.आर्शिया शेख (विषय:मी आणि राज्यघटना )हिने मिळवला आहे तर  द्वितीय येण्याचा मान प्रथम वर्षातील  चि.शुभम फल्ले (विषय:डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक युगपुरुष )आणि तृतीय प्रथम वर्षातील  कु.साक्षी डावरे जे विजेते झाले आहेत.              


अशा विध्यार्थीसाठी प्रोत्साहन म्हणून कॉलेज च्या वतीने रोख रक्कम बक्षिसाचे नियोजन सुद्धा करण्यात आले होते . यशस्वी विध्यार्थीना प्राचार्य श्री.थळकरी सर यांनी शुभेच्छा दिल्या कौतुक केले तसेच सर्व स्टाफ च्या वतीने सुद्धा सर्व विध्यार्थी चे अभिनंदन करण्यात आले .
close