shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात व शहरात विविध घटनेत चालत्या गाडीतून लुटमारी, आपसात मारामारी, व वाहनाची चोरी..!!

केज । प्रकाश मुंडे जिल्हा प्रतिनिधी:
केज मांजरसुंबा रोडवर  केज पासून जवळच असलेल्या उंबरी पाटीजवळ अज्ञात चोरट्यांनी  चालत्या टेम्पोवर  चढून,ताडपत्री फाडून टेम्पो तील 72 हजार 97 रुपयाचे एलईडी बल्ब व ट्यूब लंपास केल्याची घटना काल बुधवारी घडली. 


नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एका टेम्पोमध्ये वाघोलि पुणे येथून एलईडी  बल्प  व ट्यूब ची 687 बॉक्स भरून हैदराबाद कडे टेम्पो निघाला होता.दिनांक 14 च्या पहाटे चार ते साडेपाच दरम्यान उंबरी पाटीजवळ ही चोरी करण्यात आली. केज ला आल्यानंतर चालकाच्या ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर चालक प्रदीप मिसळे याच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला  असून तपास जमादार दिनकर पुरी करत आहेत.

दुसऱ्या घटनेत जवळबन येथील दोघा भावानी सहदेव प्रभाकर गायकवाड यास 50 हजार रुपये दिले नाही असे कारण दाखवून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण  केली व काठीने डोके फोडले.सहदेव यांच्या फिर्यादीवरून प्रवीण गायकवाड व प्रदीप गायकवाड या दोघा भावा विरुद्ध  युसुफ वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलिस  नाईक परमेश्वर शिंदे करत आहेत.
 
तर तिसऱ्या घटनेत  केजच्या शिक्षक कॉलनी भागातून नातेवाईकाच्या घरासमोर लावलेली मोटरसायकल क्रमांक  एम एच 12  के एक्स 0936 क्रमांकाची मोटरसायकल चोरून नेल्याचे निदर्शनास आले.गाडी शोधून न मिळाल्यामुळे गाडीचे मालक भगवान किसनराव सारूक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे पुढील तपास करत आहेत.
close