नाशिक विभाग प्रतिनिधि
संजय गांगुर्डे :-
येवला: ता.१५-४-२०२१
दिनांक १४ एप्रिल बुधवार रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून येवला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष सुभाष गांगुर्डे यांनी आपले वडील कालकथित भाऊसाहेब महादू गांगुर्डे स्मृतिप्रीत्यार्थ मुक्ती भुमी स्मारक येवला येथे येवला शहर पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांच्या हस्ते पाणपोहिचे उदघाटन केले.
या प्रसंगी कोऱोनाचे नियम पाळून मा.पल्लवी पगारे व्यवस्थापन अधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार मा. प्रकाश वाघ मा.सभापती येवला पंचायत समिती ,शहर उपाध्यक्ष व वडार समाजाचे कार्यकर्ते गोटू मांजरे ,सचिन सोनवणे, योगेश सोनवणे आदी मान्यवर तसेच सिद्धार्थ त्रिभुवन, सिद्धार्थ हिरे ,महेंद्र हिरे,संदिप जोंधळे, गौतम लाठे युवराज पगारे,शुभम गायकवाड़, आकाश भालेराव,सागर पडवाळ, मॉन्टी प्राइस,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

