एरंडोल प्रतिनिधी । प्रमोद चौधरी: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असतांना एरंडोल पोलिसांनी ठिकठिकाणी रस्त्यावर फिरणार्यांची अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे.
आधी पोलिसांनी बुधवार दरवाजा येथून चाचणी सुरू केली असून या पाठोपाठ एरंडोल नगरपालिका जवळ, विठ्ठल मंदिर या ठिकाणी करण्यात आल्या श्री विनोद कुमार पाटील, प्रशासनिक अधिकारी, श्री अविनाश दहिफळे, पी. एस. आय. श्री एस आर ठाकूर क्षेत्रीय अधिकारी , श्री Dr. केशव ठाकूर यांचा मागदर्शनाखाली फिरणार्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, तसेच राहुल ठाकूर, भरत महाजन, होमगार्ड उल्हास माळी, गोरख महाजन, गोरख चौधरी, पंकज महाजन, रवी वंजारी यांनी परिश्रम घेतले.

