shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीदत्त प्रतिष्ठान अलिबाग कोळीवाडा तर्फे रक्तदान शिबीर संपन्न.....!


४६ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी :-

दि.१३/४/२१मंगळवार रोजी श्री दत्त प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचा ६व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्यानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन अलिबाग कोळीवाडा येथे करण्यात आले होते. सदर शिबिरात शासन नियमानुसार सोशल डिस्टसिंग, सँनिटायझर, मास्क् इ.पालन करण्यात आले होते.

यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष मा. प्रशांत जी नाईक  यांनी  सदर रक्तदान शिबिरात सदिच्छा भेट घेऊन श्री दत्त मंदिरात पुजन केले. श्री दत्त प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सदर रक्तदान शिबिरात कोळीवाड्यातील रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे स्विय सहाय्यक संजय कांबळे यांनी रक्तदान केले.

 यावेळी जिल्हा रुग्णालय अलिबाग रक्तपेढीचे डॉ. दिपक गोसावी, हेमकांत सोनार,   प्रसाद पाटील (अधिपरिसेवक )रविंद्र कदम, महेश घाडगे यादिंनी रक्तसंकलनाचे काम केले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करणेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील , उपाध्यक्ष देवेंद्र भगत , सचिव गणेश डबरी , खजिनदार मयुरेश भगत व सह खजिनदार शैलेश डबरी आणि मंडळाचे सर्व सदस्य व सभासद आदिनी सहकार्य केले.
close