इंदापूर तालुक्यात तत्काळ जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्याची गरज : स्वप्नील सावंत
इंदापूर तालुक्यात कॉरोना ची परिस्तिथी अत्यंत गंभीर होत चालली असून तालुक्यात म्हणाव्या तस्या सुविधा नसल्यामुळे लोकांना अकलूज , बारामती , पुणे अश्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे . इंदापूर तालुक्याची असलेली लोकसंख्या पाहता उपलब्ध असलेली बेड , व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड ची संख्या अत्यंत कमी आहे . याकडे प्रशासन , शासनकर्ते व विरोधक कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसतेय .
तालुक्यामध्ये सुसज्य असे जंबो कोव्हिड सेंटर ची अत्यंत गरज आता पासूनच आहे नाहीतर येणाऱ्या काळात गंभीर परिणामाला समोर जावे लागेल . शासनाने मोठी मंगल कार्यालय , शाळा , कॉलेजे , हॉस्टेल्स ताब्यात घेऊन यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. तसेच इंदापूर तालुक्याला वरदान असलेले मोठे तीन सहकारी साखर कारखाने आहेत आणि विशेष म्हणजे हे कारखाने तालुक्यातील वेगवेगळ्या भागात आहेत . प्रत्येक कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात सुसज्य कोव्हिड सेंटर उभा करून सामाजिक भान जपावे . तालुक्याच्या लोकप्रतिनिधेने आपल्या मंत्री पदाची सर्व ताकद तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी , बेड , इंजेकशन , व्हेंटिलेटर,ऑक्सिजन, औषध गोळ्या जास्तीत जास्त सुविधा तालुक्यात आणण्यासाठी लावली.
तसेच एक वेगळी यंत्रणा 100 टक्के लसीकरण करून घेण्यासाठी लावणे अत्यंत महत्वाचे आहे. अद्याप हि विना मास्क फिणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे . त्यांच्या वर कडक कारवाई झाली पाहिजे .
तालुका पातळीवर एक हेल्पलाईन ची सुविधा उभा करावी ज्यामधून एका फोन वर उपलब्ध असलेले दवाखाने बेड , व्हेंटिलेटर , ऑक्सिजण , गोळ्या व औषध याची माहिती रुग्णांना समजेल व निश्चितच यातून रुग्णाचे प्राण वाचण्यासाठी मदत होईल .
असे मत तालुका काँग्रेस चे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला .

