अंकिता पाटील यांनी राजकारण्यांसमोर ठेवला एक नवा आदर्श!
कोरोना काळात स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा नेतेमंडळी इतरांना नियम शिकवताना स्वतः मात्र ते आचरणात आणताना दिसत नाहीत. पंरतु याला पुणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील या अपवाद ठरल्या आहेत. आज बावडा ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अंकिता पाटील यांना याठिकाणी अस्वच्छता आढळून आली तेव्हा कोणताही विलंब न करता त्या थेट साफ-सफाईल लागल्या. त्यांच्यासोबत इंदापूर पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांनी देखील संपूर्ण बावडा ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता केली. ,
लॉकडाऊनमुळे आपल्याकडे मदतीसाठी कामगार उपलब्ध नाहीत. स्वच्छता केली नाही तर रुग्णालय सुरू करण्यास विलंब होईल म्हणून सर्वांनी उद्घाटनापूर्वीच रूग्णालयाची संपूर्ण स्वच्छता केली व कोविड केअर सेंटर कोणताही विलंब न करता सुरू केले. अंकिता पाटील यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रुग्णालयाची स्वच्छता करून सर्वांसमोरच एक नवीन आदर्श ठेवला आहे.
राजकारण्यांनी फक्त राजकारण न करता व एकमेकांना दोष न देता स्वतः फिल्डवरत उतरून कार्य केल्यास कोणतीही अडचण येत नाही. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे त्यांच्यासाठी आपण झोकून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन कु अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी केले.
यावेळी इंदापूर पंचायत समितीचे सभापती सौ.स्वाती शेंडे, उपसभापती संजय देहाडे, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, सदस्य अमोल घोगरे, ग्रामसेविका पावसे मॅडम तसेच बावडा आरोग्य केंद्राचे डॉक्टर घोगरे व इतरांनी रुग्णालयाची स्वच्छता केली.

