shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उमरखेड येथील कोविड लसीकरण केंद्रास भेट देऊन खासदार हेमंत पाटील यांनी केली पाहणी..!!



हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१६,कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उमरखेड येथे सुरु असलेल्या लसीकरण केंद्रास खासदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी उपाययोजना बाबत उमरखेड मधील शिवसेना  पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली . 


देशात आणि राज्यात कोविड रुग्णाची  संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर लसीकरण आणि तपासणी करायचे प्रमाण वाढले आहे गशहरी सोबतच ग्रामदिन भागात सुद्धा तपासणीचा वेग वाढला असून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्य करत आहे . 

याच पार्श्वभूमीवर मतदार संघातील उमरखेड येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी  उमरखेड येथील शासकिय रुग्णालयाला भेट देऊन त्याठिकाणी ,पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला व कोरोना काळात रुग्णांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे त्यांना सर्व सुविधा औषध, यांचा पुरवठा झाला पाहिजे, व घरोघरी जाऊन कोविड तपासणी करण्यात यावी असे निर्देश संबंधितांना दिले तसेच   रेमडीसीआर इंजेक्शन  चा मुबलक साठा  उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी यांना संपर्क करून योग्य ते सहकार्य करण्यात यावे,कुठलीही कमतरता असू नये असे सांगितले,  यावेळी खासदार  हेमंत पाटील यांनी सर्व तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत कोविड चा वाढता प्रभाव लक्षात घेता नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली . व  तेथील  विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असता यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम ,उपजिल्हा प्रमुख बळीराम मुटकुळे, जिल्हा संघटक राजेश खमानेमर,तालुका प्रमुख सतीश नाईक,शहर प्रमुख संदीप ठाकरे,गोपीचंद दोडके,नितीन कलाने,अतुल मैद ,संतोष जाधव, तालुका आरोग्य अधिकारी  कलपे,वैद्यकीय अधिकारी मांडण, नगरपरिषद मुख्यधिकारी इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
close