shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहुजन समाजातील गोर गरीबांचा वकील नेताजी हरपला...!

प्रतिनिधी । मोहन शेगर:-
सोनई :- "जगायचे म्हणुण नुसत जगायचं नाही तर..व्यवस्थेच्या नाकावर मरेपर्यंत टिच्चुन जगायचे" हे वाक्य संविधान नायक संघटनेचे अध्यक्ष विश्वासजी वैरागर यांच होतं.आज सकाळी मोहन शेगर या मिञाचा फोन आला तो म्हणे विश्वास वारला...! मला तर विश्वासच बसला नव्हता.मग नेवाशाला भाजपाचे तालुकाध्यक्ष नितिन दिनकर यांना फोन लावला ते म्हणाले संदिपभाऊ मी खुप प्रयत्न केले पण नाही वाचु शकलोो.!. तुमच्या नेताजीला.राञीच भाऊ कासार यांच्याकडुन समजले होते. नेताजी सिरियस आहे.भाऊ म्हणे मी राजुभाऊ गुगळेंना सांगितले आहे ते पण मदत करत आहेत.आपन कस करून नेताजीला वाचु अगदी भाऊ कासार हळवे होवुन रडत रडत मला सांगत होते.मग आम्ही सर्व मिञ मिळुन बरेच प्रयत्न करत होतो.देवाकडे एकच आशा होती नेहमी मिञांच्या सुख दुखात मतभेद विसरून मदतीला धावणारा देवदुत म्हणुण सोनई गाव आमच्या या मिञाला विश्वासला मानत असत. ऊन वारा पाऊस न पाहता समाजासाठी लढणारा हा माणुस या विषाणुच्या आजाराने हतलब झाला खुप वाईट वाटले असा मिञ होणे नाही.  

             कैैैै. विश्वासजी वैरागर

आमचे मिञ विश्वास वैरागर अगदी शालेय,काॅलेज जिवनापासुन फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन सतत गोर गरीबांचे मदतीला धावून येणारे हुशार अभ्यासु असणारे व्यक्तीमत्व होते.माझा आणि विश्वास यांचा परिचय अकरावी पासुनच्या काॅलेज जिवनापासुन झाला.मला ते सिनियर होते पण सतत गोर गरीबासाठी,बहुजन समाजातील होतकरू मुलांसाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मध्ये होती.

यामुळे काॅलेज मध्ये असताना एन.सुब्बराव यांची  NYP ची स्किम राबवली या आम्ही सर्व तरूण मिञ सामाजिक कार्यात सहभागी झालो होतो.यामुळे विश्वास यांचा सहवास लाभला.प्रत्येक विषयावर प्रंचड अभ्यास भरपुर वाचन बेडर स्वभाव एखादावर अन्याय झाला तर वाचा फोडण्यासाठी सगळयात पुढे तुम्ही घाबरू नका मी आहे हे त्या अधिकार्याला आपन एका कागदावर वाकवु अशी धमक होती.तालुक्यातील व जिल्हातील कुणीही गरजवंत येवु दया.एखादावर अन्याय झालेला असु दया पण विश्वास यांच्या कोर्टात हा प्रश्न मांडला तर ते अभ्यासु पदधतीने त्याचा प्रश्न बिगर पदवीची वकिली करून तडीस नेत असत.

यासाठी ते कधीही ऊन वारा पाऊस बघत नसत दिवस राञ एक करत ते रोज याच कामात सक्रिय असत.मला आठवते एकदा मी विश्वास यांच्या सोबत नगरला होतो.नेवासा येथील एका बहुजन कुटुंबातील महिला खुप सिरियस होती पण पैसा अभावी तीला नगरमधील एक नामांकित धर्मदाय हाॅस्पिटल icu चे पैसै भरल्याशिवाय अॅडमिशन करू देत नव्हते.बिचारे हातावरचे गरीब कुटुंब पैसै कसे देणार.मग विश्वास  यांचा पहिल्यादा मी रूद्र अवतार पाहिला.कारण शाहु फुले आंबेडकर चळवळतील कार्यकर्ता असल्याने त्यांना तो प्रसंग शांत बसवु दयाना.मला म्हणाले संदिप आपल्याला आता येथेच आंदोलन करावे लागणार आहे.

राञी उशिर झाला तरी चालेल.अशा रितिने आम्ही संध्याकाळी सात वाजता त्या हाॅस्पिटलच्या लाॅबीमध्ये घोषणा देत ठिय्या आंदोलन मांडले.निवासी जिल्हाधिकारी पालवे व पालकमंञी शिंदे,हाॅस्पिटलच्या संचालकाला  फोन करत असे तसे करत राञी दहा वाजता त्यांनी पेंशट घेतले.कारण एकच होते विश्वास हे हुशार अभ्यासु असल्याने त्यांनी कलेक्टरला एकच मुद्दा मांडला हे दवाखाने धर्मदाय संस्थेच्या नावाखाली नोंदणी करून शासनाकडुन नाममाञ दराने भाडयाने जागा घेतात.बांधकामासाठी कमी व्याजाने कर्ज घेतात मग यांना सगळेच नाही पण गोरगरीब हातावर पोट भरणारे लोकांचे उपचार मोफत करायला काय झाले.आणि तसा शासनाचा जिआर पण आहे.लगेच त्या दवाखान्याची तक्रार ते जिल्हाधिकारी व मंञालयीन स्तरावर करत असत.पोलिस स्टेशन बाबतीत पण ते कोणी गरीब अन्याय झालेला असेल तर नेहमी मदतीला धावुन येत असत.

कायदाचा प्रंचड अभ्यास होता पण त्याचा कधी गैरवापर केला नाही.कुणाला बळेच ञास होईल असे कधी वागले नाहीत.गावातील अतिक्रमणा बाबत त्यांचे एक मत मांडले होते ते म्हणजे प्रत्येक समाजातील गोरगरीब होतकरू तरूणासाठी ग्रामपंचायतने जागा दिली पाहिजे.किंवा मोठे संकुल बांधुन तरूणांच्या उपजिवेकेसाठी गाळे बांधुन भाडयाने दिले पाहिजे.अशी प्रामाणिक भुमिका असणारा आमचे मिञ मार्गदर्शक आधारस्तभ असलेले आणि ज्यांनी आम्हाला समाजात अन्याय झाला तर त्यांच्या बाजुने नेहमी उभे राहण्याचा सल्ला दिला.

कधी पण पञकारिता करताना गोरगरीबांना न्याय दया समाजासाठी लढा म्हणुण आम्ही आजपर्यंत फक्त सामाजिक कार्य करत आलो.आणि येथुन पुढे आपले अनमोल मार्गदर्शन वाया न जावु देता गोरगरीब समाजासाठी नेहमी काम करून आपल्या समाजसेवेचा वसा नेहमी जपु.हीच आपनाला भावपुर्ण श्रद्धाजंली.

आपला शोकाकुल मिञ-संदिप दरंदले पाटील.प्रदेश कार्याध्यक्ष-शिव छावा शेतकरी संघटना महाराष्ट्र.पञकार दै.भास्कर मोबा-9850594609
close