प्रतिनिधी । संजय वायकर :-
करमाळा : (दि.२९ ) :कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव सदानंद तरकसे काका यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.
तरकसे काका यांनी करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी चे सचिव, विद्या विकास मंडळ करमाळाचे विश्वस्त पदी कामकाज पाहिले होते.
देशभक्त कै . नामदेवरावजी जगताप व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. तरकसे काका अत्यंत प्रामाणिक, प्रेमळ व मितभाषी सद्गृहस्थ म्हणून सर्वत्र परीचित होते .
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. करमाळा शहर , मार्केट यार्ड व किल्ला विभाग परीसरात तरकसे काकांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महात्मा गांधी विद्यालयाचे सहशिक्षक मंगेश तरकसे सर यांचे ते वडील आहेत.

