shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे निष्क्रष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवुन कंपनीवर कडक कारवाई करा... -निलेश साखरे..!!

प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:-                      केज शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम सद्या चालू आहे. हे काम करणाऱ्या कंपनीवर कुणाचे नियंत्रण आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण केज शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम निष्क्रष्ट दर्जाचे होत असून या कडे कोणीही तत्सम अधिकारी लक्ष देत नाही. तरी सदरील कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवक आघाडी व कार्यकारिणी सदस्य ( बबलू  ) निलेश साखरे यांनी केली आहे.  

                          

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील काम तर थातुर मात्र पद्धतीने उरकून घेण्यात येत आहे . येथुन सर्व बाजूंनी मुख्य रस्त्ये जोडलेले आहेत.                                              
एच पी एम कंपनीकडे सदरील काम आहे हे काम तात्काळ तपासून त्याचा दर्जा तपासुन कंपनीवर कडक कारवाई करावी नसता बहुजन विकास आघाडी तर्फे तिव्र आंदोलन   छेडण्यात येईल असी मागणी केज तहसीलदार  साहेब यांना निवेदन देऊन  निलेश(बबलू)  साखरे,  वाघमारे उत्तम, विजय आंडील व लांडगे गणेश यांनी  केली आहे.
close