पिंपरी चिंचवड:-दारिद्र रेषेखालील नागरिक व कचरा,काचपत्रा व भंगारवेचक यांना आर्थिक सहाय्य करणे औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व क्षेत्रातील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्याची दखल घेत महापालिकेच्यावतीने दारिद्र रेषेखालील (पिवळे रेशनकार्डधारक) परिवारास आर्थिक सहाय्य करण्यात यावे व तसेच शहरातील मंडप व्यवसायिक व कचरावेचक यांनासुद्धा अर्थसहाय्य योजनेमध्ये समावेश करून घेण्यात यावे.
असे युवासेना पिंपरी विधानसभा अध्यक्ष निलेश हाके त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नितीन लांडगे स्थायी समिती अध्यक्ष यांना निवेदन पत्र दिले.

