कोवीड रुग्णासाठी जर ॲम्ब्युलन्स वापरता येत नसेल तर त्याचं काय लोणचं घालणार का ?
प्रतिनिधी । संजय वायकर :-
करमाळा : माढा मतदार संघ आमदार फंडातुन करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे नवीनच रूग्णांच्या सेवेसाठी दाखल झालेली ॲम्ब्युलन्स गाडी कोव्हिड रूग्णासाठी उपलब्ध होऊ शकत नाही तर ती फक्त इतर रूग्णांसाठी आहे अशी माहिती मा. संजय (बापु) घोलप मनसे तालुका अध्यक्ष यांना उपजिल्हा रुग्णालयाचे संबंधीत अधिकारी यांच्या कडुन समजले .
आज पुणे येथे करमाळा कोव्हिड हाॅस्पिटल च्या रूग्णासाठी ॲम्ब्युलन्स पाहिजे होती . कारण कोरोना बाधीत रुग्णाला त्रास होऊ लागल्याने पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठवायचं होतं . पण ती ॲम्ब्युलन्स कोव्हिड रूग्णासाठी नाही असे समजले व धक्काच बसला.
आजच्या अशा महामारी च्या परिस्थितीमध्ये ॲम्ब्युलन्स गाडी कोणती का असेना रूग्णाचा जीव वाचणे महत्वाचे आहे .तरी आम्ही मा.आमदार साहेबांना विनंती करणार आहोत की ज्या आमदार फंडातुन ही गाडी मिळाली ती जर त्याच मतदार संघातील जनतेचे प्राण वाचवू शकत नसेल तर त्या गाडीचा काय उपयोग आहे ? तुम्ही त्या गाडीचं काय लोणचं घालणार आहेत का ?
त्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना,करमाळा तालुका व शहर च्या वतीने विनंती करतो कि सध्या कोव्हिड पेशंट जास्त असुन प्रवासाच्या सुविधा कमी आहेत व अचानक करमाळ्यात असलेले कोव्हिड पेशंट ला त्रास झाल्यावर बार्शी, पुणे, नगर,कोठेही बेड उपलब्ध असेल तिथे जावे लागेल .108 नं .च्या ॲम्ब्युलन्स पण लवकर उपलब्ध होत नाहीत. त्यापण कमी पडतात .
मा.आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा तालुका व शहर च्या जनतेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,करमाळा अशी मागणी करत आहेत की त्या ॲम्ब्युलन्स गाडीचा कोव्हिड पेशंट साठी पण उपयोग करण्यात यावा आणि पेशंटचा जीव वाचवण्याला अगोदर प्राधान्य देण्यात यावे .

