अंकिता पाटील यांनी बावडा येथील सर्व सुविधायुक्त ५० बेडचे कोविड सेंटरला भेट देऊन स्थानिक प्रशासनाशी चर्चा करीत कर्मचारी व आरोग्य यंत्रणेने संदर्भात आढावा घेऊन केले कोविड सेंटर सुरू..!!
बावडा येथे सर्व सुविधायुक्त 50 बेडचे कोविड सेंटर सुरू
अंकिता पाटील यांनी कोविड सेंटर मधील बेड उभारणीसाठी केली सेवा
इंदापूर प्रतिनिधी:-राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बावडा येथे उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दिनांक २३ एप्रिल रोजी करून जनतेच्या सेवेसाठी खुले केले होते. दिनांक २८ एप्रिल रोजी बावडा येथील ग्रामीण रुग्णालयात बावडा व परिसरातील नागरिकांना कोरोना महामारी वर मोफत उपचार मिळावा यासाठी ५० बेड चे सर्व सुविधांनी युक्त कोविड सेंटर सर्व नागरिकांच्या सेवेसाठी सर्व बाबींची पूर्तता करत सुरू करण्यात आले आहे.स्वतः अंकिता पाटील यांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये बेड उभारणीसाठी पदाधिकारी व कर्मचारी समवेत मदत केली.
अंकिता पाटील यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करत कर्मचारी व आरोग्य यंत्रणेने संदर्भात आढावा घेतला. अंकिता पाटील यांनी बावडा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी मागणी करून जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेकडून कोविड सेंटरसाठी १० लाख रुपये किमतीचे आरोग्य साहित्य व उपकरणं मिळवले होते. ते साहित्य उपकरणे आजपासून रुग्णांसाठी खुली करण्यात आली आहेत.
बावडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली असून आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे.

