shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"स्वच्छ पाण्याचा झरा आहे मी" ही कविता अवश्य वाचा..!

"स्वच्छ पाण्याचा झरा आहे मी"


माझ्या दुनियेत बरा आहे मी
स्वच्छ पाण्याचा झरा आहे मी

उद्याची बात उद्याच करतो मी
स्वयंप्रकाशीत लखलखता तारा आहे मी 

जोडता येत नसेल तर तोडु नकोस माणसा
उष्मा घात मोजणारा पारा आहे मी

काय संगती घेउन जाणार जातांना तु
माणुस आहे माणसांचा प्यारा आहे मी

उसवलेल आभाळ शिवता येत नाही तरी
काळजाला शिवणारा दोरा आहे मी

शतकात देशभक्ती नव्हतीच त्याच्या आत
क्रिकेट जगताचा ब्रायन लारा आहे मी

माझी ओळख ठेवुन जाईन शेवटी जातांना
काय नाय हो फक्त खरा आहे मी

नायनाट झाल्यावरही पुसणार नाही वहीवाट
नफरत करणार्यांचाही प्यारा आहे मी

घोषना देवुन ते जिंदाबाद बोलुन निघुन गेले
माणवतेला विजयी करणारा नारा आहे मी

माझ्या दुनियेत बरा आहे मी
स्वच्छ पाण्याचा झरा आहे मी

आकाश सुपारे
9822510254
close