shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर मार्केट यार्ड मध्ये भीषण आग लागून लाखोंचे नुकसान...!



संगमनेर । प्रतिनिधी ( ऋषिकेश जगताप):-

संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला मंगळवारी सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आग विझविण्याचे काम सुरु होते ,गोदामातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.


संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस वखार महामंडळाचे गोदाम आहे या गोदामात धान्य व कापूस अशा वस्तू साठवून ठेवलेल्या असतात. मंगळवारी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली. या आगीने जाळाचे मोठे लोटच बाहेर पडत होते. त्यामुळे एकच धावपळ उडाली. 

संगमनेर साखर कारखाना व नगरपालिका बंबास पाचारण करण्यात आले असून युद्ध पातळीवर आग विझविण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी शहरातील पदाधिकारी व बाजार समितीचे सदस्य उपस्थित होते.भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करीत करीत असल्याचे दिसत होते.
close