राहुरी (पत्रकार शिवाजी घाडगे ):-
होय लोकसत्ता चे पत्रकार अशोक तुपे हे पत्रकारांचे कुलगुरू होते. कारण सार्वमत चे दिवंगत संपादक वसंतराव देशमुख यांच्या विद्यापीठ मध्ये अशोक तुपे तयार झाले होते. अन् तुपे यांनी जी शेवटची मुलाखत घेतली ती महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे नवनिर्वाचित कुलगुरू डाॅ पी जी पाटील यांची, ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू म्हणून सेवेत आले, त्यांचा स्नेह सत्कार करायचा व त्यांची मुलाखत घ्यायची म्हणून त्यांचा गुरुवारी दुपारी मला फोन आला. मी माझ्या दुचाकीवर विद्यापीठांत गेलो, राजे जनसर्पक कार्यालयात डाॅ पंडित खर्डे यांच्या बरोबर गप्पा मारत बसले होते. मी पोहचल्यावर चहा पाणी झाला. आम्ही कुलगुरू डाॅ पी जी पाटील यांच्या कार्यालयात गेलो, पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. अण गप्पा सुरु झाल्या, किमान दोन तासात दहा वेळा कुलगुरू राजे यांचा संदर्भ आपल्या नोट पॅड वर लिहून घेतले. नंतर डाॅ रसाळ यांच्याकडे आम्ही वळलो, खपली गव्हा सह गव्हावर किमान एक तास चर्चा झाली. डाॅ दादासाहेब भेटले असते तर आजुन दोन तास चर्चा झाली असती.
रात्री मुळा नगर फाट्यावर फुले भोजन घेतलं. तेथे काही मित्र जेवनासाठी आले होते, मला म्हणाले हे तुपे साहेब का? मी हो म्हणत बाहेर पडलो, पुन्हा बाहेर श्रीरामपुर येथील काही लोक भेटले, राजे जेवायला चला, आता नंतर जेऊ असे म्हणून नेहमी प्रमाणे माझी त्यांच्याप बरोबर ओळख करून दिली. हे आपले राहुरी चे पत्रकार शिवाजी घाडगे.. आपला माणुस..! तेथुन पुन्हा माझी दुचाकी साठी आम्ही विद्यापीठमध्ये आलो, विद्यापीठ व शास्त्रज्ञ यांच्या बरोबर विद्यार्थी यांचे सुध्दा त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. विद्यापीठाच्या ग्रंथालय गेलो. होय आम्ही शेतकरी हा व्हाट्सअप गृप चालवत असलेल्या युवकाचे त्यांनी कौतुक केले.
त्या दिवशी फॅक्टरी पर्यंत येत राजेनी निरोप घेतला. पुन्हा दोन दिवसांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांनी मला करोना झाला असुन मी रुग्णालय उपचार साठी दाखल झालो असल्याची पोस्ट सोशल मिडियावर टाकली. राजेंचा लगेच मला फोन आला, अरे राजे अप्पासाहेब यांना म्हणावे चांगल्या रुग्णालयात उपचारा साठी दाखल व्हा. असा सल्ला दिल्ला. अरे मला देखील कण कण आली आहे, मी म्हणालो राजे तपासणी करून घ्या, अण काय रिपोर्ट येतो ते सांगा. दुपारी मला फोन आला, राजे डेगु सागितला..! मी म्हणालो मागच्या वर्षी तुम्हाला डेंग्यूने घेरले होते. बरं झालं राव कोरोना स्टेट पॉझिटीव्ह आली नाही म्हणत आम्ही सुटकारा सोडला. नंतर पाच दिवसांनी राजे यांचे बंधु दिलीप यांनी रात्री साडे दहा वाजता राजे कोरोना मुळे साई दिपला ऍडमिट करुन आलोय असे सांगितले.
काळजाचा ठोका चुकला.. रात्री अकरा वाजता श्रीरामपुरचे व्यापारी भरत कुंकूलोळ यांनी मोबाईल केला व आपले राजे कोठे आहेत याची चौकशी केली .. सकाळी सुनिल मुथ्था यांचा मोबाईल आला.. राजे कोरोना पॉझिटीव्ह आलेत .. राजेच्या पत्नी व पुतणी यांना देखील उपचारासाठी ऍडमिट केले होते.
नंतर पुन्हा राजेनी मला मेसेज करून सांगितले की तपासणी करून घे.. तु माझ्या बरोबर होता.. तसेच अप्पासाहेब बरोबर देखील होता. मी राजेना म्हणालो मला काहीच लक्षणे नाहीत व काही नाही शिवचिदंबर आहेत असा मेसेज केला, नंतर रुग्णालयातून दुसरया दिवशी मुलगा बाहेर गेल्यावर राजेंनी कळकळीने मोबाईल वरून सागितले की राजे चेक करून घे.. नाहीतर डाॅक्टर घरी पाठवीण.! इतक्या हक्काने सागितले. नंतर पुढे पंधरा दिवसा नंतर राजेची तब्ब्येत खालावली होती, साईराम पाटील बानकर भेटुन आले.. त्यानी पोपटराव पवार डाॅक्टरांच्या संपर्कात असल्याचे सागितले.. राजेचे भाऊ दिलीप यांचा संपर्क मोबाईल वर कायम होता, मी राजेच्या मोबाईलवर संपर्क करायचो.. नंतर अभिजीत भैय्या बोलायचा.. आता अण्णा चांगले झाले आहे .. जेवतात.. लवकरच ऑक्सीजन रुम बाहेर आणणार आहे. व सोडणार असल्याचे सागितले. मग गुरुवारी दुपारी साईराम पाटील यांचा मोबाईल आला.. अण आपला मित्र गेला असा दुःखद संदेश दिला.. अण डोळ्यात अश्रू आले.. घरातील वातावरण गंभीर झाले.. जवळच्या संपादक मित्रांनी माहीती दिली अण सोशल मिडियावर राजे आपल्यातुन निघुन गेले असे मेसेज टाकले .. !
राजे व माझे संबंध हे गेली २७ वर्षाचे होते, मी गांवकरी मध्ये वार्ताहर होतो.. नंतर मी सात पेपर बदलले.. परंतु राजे सत्ताविस वर्षे लोकसत्ता मध्ये राहीले.. श्रीरामपुरला गेलो म्हणजे लोकसत्ता कार्यालयात राजेला भेटल्या शिवाय येत नसे.. नंतर लोकसत्ता कार्यालय बंद झाले.. मग राजे अनिल पांडे यांच्या पद्मा पब्लिसीटी मध्ये कायम असायचे.. भेट झाल्यावर जेवण.. नाहीतर बेलापुर ग्रामपंचायत समोर दुध घे .. तेथील बर्फी घरी पोरांना बांधुन देणार..! कधी मधी बाभुळगावला चिदंबर स्वामी यांच्या दर्शनाला जायचं म्हटले की राजे नेहमी हजर..!
नंतर एकदा राजेंचा वाढदिवस सप्टेंबर मध्ये असल्याने पंढरपूरला आम्ही दोघं व त्यांच्या गावातील खरात असे तिघे गेलो होतो, तनपुरे बाबा मठात राहीलो .. विठ्ठल रुख्मिणी दर्शन घेतले .. नंतर तनपुरे बाबा मठापुढे दुधाची माहीती घेत राजेनी त्या दुध धंद्यातील गमक जाणुन घेतले .. नंतर तनपुरे महाराज यांचे सकाळी आर्शिवाद घेतले.. आम्ही गेलो की महाराज त्याच्या पत्नीला बोलले की, हे बघा तुमच्या माहेरची माणसें आली आहेत.. ! असे सांगितले नंतर तनपुरे महाराज व राजे यांची चर्चा दगडगावच्या कार्यक्रम बाबत झाली, त्याचे निमंत्रण महाराजांनी आम्हाला दिले .. !
नगरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला रमन मुथ्था, बाळासाहेब आगे, बाळासाहेब भांड, सुभाष कुलथे व आम्ही गेलो .. पुढे विधानसभा निवडणूक मध्ये राजेचा एक्सझिट पोल देखील कमालीचा मिळता जुळता निघायचा.. !
राजे बरोबर शनि शिंगणापुर येथे संगीत मार्तंड पद्मभूषण, पद्मविभूषण पंडित जसराजजी यांची भेट व मुलाखत .. ! अथवा मराठा आरक्षण, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या सभेसाठी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांना दिलेल्या सुचना असो .. की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व बुल सेन्टर येथे राष्ट्रवादी नेते खा शरद पवार यांना तुम्ही या विद्यापीठला केलेली मदत आठवुन देताना खा शरद पवार आपल्या वहानात बसायच्या आधी कृषी विषय चर्चा करायला भाग पाडणे.. शेतकरी संघनेचे नेते माजी खा राजु शेट्टी , माजी खा यशवंतराव गडाख, खा संजय राऊत, केद्रीय मंत्री रामदास आडवले, माजी खा प्रसाद तनपुरे यांच्या बरोबर चर्चेचा योग राजे मुळे मला मिळाला.. मंत्री, खासदार, आमदार, नेते कार्यकर्ते यांच्या बरोबर भेटायचा योग राजे मुळे आला.
शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष दिवंगत जंयत ससाणे म्हणा की, माजी आमदार लोकनेते भानुदास मुरकुटे, राहुरी कारखानाचे माजी अध्यक्ष दिवंगत रामदास धुमाळ, तसेच जेष्ठ नेते ॲड सुभाष पाटील, यांच्या बरोबर भेटी वेळी राजे बरोबर मी नेहमी असायचो..!
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , खा सुप्रिया सुळे , आमदार निलम गो-हे , तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याना थेट मोबाईल वरून साधलेला संपर्क राजे माहिती घेत असत अनेकदा मोबाईलवर बोलताना साहेब लोकसत्ता सिनियर रिपोर्टर अशोक तुपे बोलतोय म्हणून राजेची सुरवात असायची.. .एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात श्रीरामपुर नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी राजेना दादा म्हणून मारलेली हाक .. अथवा नगसेवक संजय फड यानी प्रेमाने मारलेली मिठी, श्रीरामपुर येथील तृतीय पंथीय मेळावा , कव्वाली कार्यक्रम, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना तुम्हाला मला काही सांगायचे आहे, आपण एकदा भेटु असे हक्काने सागणारे राजे..! दापोली येथील पत्रकारांच्या कार्यशाळे साठी सुधीर मेहता , बाळासाहेब भांड , महेश माळवे, दिवंगत प्रदीप राजगुरु, गायकवाड यांच्या सह मी होतो . .! मोठी धम्माल आली होती, पुणे यशदा येथे लोकसत्ता ने आयोजित केलेल्या मिल्क परिषदेच्या वेळी संपादक मुकुंद संगोराम याना मी श्रीरामपुर येथील भाषणातील गणपती आठवण करून देताच राजे तुमचा मित्र भारी आहे ही संगोराम याची दाद.. पुढे कोल्हापूर देवीचे दर्शन.. मात्र कोरोना मुळे बालाजी दर्शन जायचे राहुन गेले.
अनेकदा राजेची मोटारसायकल माझ्या घरासमोर लाऊन मी पुण्याला चाललो आहे असा निरोप द्यायचे.. कोणाच्या ही सुख दुःख मध्ये राजे सामिल व्हायचे.. गप्पा मारता मारता अनेक विषय ते बातम्या करायचे.. प्रवासात असलो की गाडी थांबून शेतकरया बरोबर चर्चा करायचे .. एखाद्या तज्ञ बरोबर मोबाईल वरून त्याची चर्चाही घडून आनायचे.. मला राजे म्हणत असत ज्याला कोणी नाही त्याला आपण. आपल्या वर लोकाचा विश्वास आहे, तो तुटला नाही पाहिजे. पेड न्युज, पाकीट सस्कृती वर जाहीर पणे बोलणारे राजे होते. राजे सान्निध्यात असल्याने आम्ही या पासून नेहमी दुर राहीलो. राजे माझे जिवंलग मित्र होते. त्यानी ग्रामीण कष्टकरी दिनदलित शोषित जनतेच्या सुखासाठी आपली लेखनी तेवत ठेवली.
आपलं नानं खणखणीत पाहिजे आपल्या जिल्ह्याला दिवंगत मुकुंदराव पाटील यांच्या चांगल्या पत्रकारीतेचा वारसा असुन तो आपण संभाळला पाहिजे, गावात सप्ताहात होणारा खर्चे गावातील जलसंधारण कामा साठी वापरायला पाहिजे अस राजे म्हणायचे ..!
राजेनी आपल्या लेखनीतुन अनेकांच्या व्यथा मांडल्या .. शेवटी कोरोना शिवलाच, अन सैनिकांला युध्दात विर मरण यावं त्याला तिरंग्यात लपेटावे तसा माझा दिलदार पत्रकार मित्र अशोक तुपे शेवटी बातमीतच लपटला गेला. पत्रकार राजे तुम्ही किती मोठे होता हे तुमचे आमच्यातुन जाण्याने दाखवुन दिले. कदाचित लाॅकडाऊन नसता तर तुमच्या अंत्यसंस्कार साठी पहिला व्यक्ती कान्हेगाव मध्ये तर शेवटचा व्यक्ती बेलापुर मध्ये असता. दिव्य मराठी संपादक संजय आवटे तसेच जेष्ठ पत्रकार सतीश कुलकर्णी यांच्या पासून ते शेवटच्या गाव बातमीदार आदी सर्वांनी तुमच्या कार्य कर्तुत्वाला सलाम केला...! असंख्य चाहत्यांच्या स्टेटस वर राजे होते. राजे तुम्ही खरच वृत्त पत्र सुष्टीतील चालत बोलत विद्यापीठ.. व त्याचे कुलगुरू तुम्ही स्वःहाच होता. तुम्ही कोणाचा आकस धरला नाही.. जे बोलतात लिहल ते समाज हिताच...! कधी फोन आला नाही अस कधीच झालं नाही.. ! राहुरी विद्यापीठ मध्ये येणार त्यावेळी फोन करुन राजे या चला जाऊ किंवा नगर जाताना गाडीत माझ्या साठी श्रीरामपुर येथून एक जागा रिकामी ठेवून बोलुन घेणार.. देवळाली जवळ आलोय आवरून समाधान जवळ या म्हणत. अनेक राजकीय नेते व अधिकारी यांच्या बरोबर च्या भेटीत हे आपले राहुरी चे पत्रकार शिवाजी घाडगे असं सागुन हा आपला आहे म्हणत.. राजे यानी अनेक वेळी बातमी पलिकडे संबंध प्रस्थापित केले होते .. ! बातमी लिहिताना कधीच हात अखडता घेतला नाही.. ! शेतकरी व बहुजन समाज यांना राजे आपला जवळचा वाटायचे.. मोटारसायकलवर रात्री व अपरात्री राजे कान्हेगावला जायचे पण कधीच भिती वाटली नाही .. कारण काही सचित केले नाही.. कोणी प्रवासासाठी उभा असलाकी राजे त्याला आपल्या मोटारसायकल वर बसून घेत...! गप्पा मारत त्यांचा प्रवास सुखाचा करायचे.
राजे म्हणत, आता मी सेवानिवृत्त घेऊन टाकतो.. व द्राक्ष बाग डाळिब करोतो.. मी म्हणायचो राजे लोकसत्ता ने लोक काढुन टाकले तुम्ही एक मेव असे आहात तुमच्या लेखाला लोक शिवार मध्ये अर्ध पान मिळते.. एबीपीचे राजीव खांडेकर यांना मी मुंबई भेटीत राजेच नाव सागितले.. ते लगेच म्हणे अशोकराव काय भारी माणूस, फोन लावा त्याना..! मग पुढे नगर जिल्हात अनेक वेळी खांडेकर आले ते राजे मुळे...!
काही महीन्यापुर्वी महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक भारतकुमार राऊत यांच्या बरोबर मोबाईल वर बोललो, कोरोना संपला मी तुमच्या कडे येतो असे राऊत म्हणाले तर पुणे लोकमत प्रशांत दिक्षीत याना रोटरी कार्यक्रम साठी विचार अथवा दिव्य मराठी संपादक संजय आवटे याच्या गाडी बरोबर बसून गप्पा मैफिल जमवणारे नंदकुमार सोनार यांचं निधन झाल्यावर त्याचं व माझा सार्वमत काळ कसा होता.. पुन्हा भेटुन आले राजे.. अण शेवटी कोरोना बरोबर लढत असताना सर्वानी काळजी घ्या लग्न, विधि, सामुहिक कार्यक्रम टाळा दोन मास्क लावा .. गरज नसताना फिरू नका.. असा सल्ला दिला. मला कोरोना लढवतो आहे.. ते राजे पुन्हा आलेच नाही.
कदाचित आता श्रीरामपुरहुन अनिल पांडे , बाळासाहेब भांड, बाळासाहेब आगे , सुनिल मुथ्था , मारुती राशिनकर, महेश माळवे गाडीत असतील देखील परंतु माझ्या साठी गाडीत एक जागा मोकळी ठेवणारा माझा हक्काचा मित्र अशोक तुपे नसतील..; आणि शनि शिंगणापुर चे पोलिस पाटील साईराम पाटील बानकर ही मला श्रीरामपुरला जाताना राजे कडे नेणार नाहीत. राजे तुम्ही आम्हाला सोडून गेलात.. ते परत आलाच नाही. असे असले तरी तुम्ही निर्माण केलेल्या सच्चाईच्या वाटेवर आम्ही धडधाकट पणे चालत राहु हीच तुम्हाला अंत करनातुन आदरांजली...!

