shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बारावीची परीक्षा व मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करावे- अंकिता पाटील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे मागणी

बारावीची परीक्षा व मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करावे- अंकिता पाटील
 शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे मागणी
इंदापूर प्रतिनिधी:-
  कोरोना पार्श्वभूमीवर वाढत असणारा संसर्ग त्यामुळे मानवी जीवनावर आलेले भयावह संकट यामुळे यावर्षी बारावीची परीक्षा व मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करावे अशी मागणी व विनंती जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केली.
   अंकिता पाटील आपल्या पत्राद्वारे म्हणतात की,'मा. मंत्रीमहोदया वर्षाताई, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अधिक प्रभावी असून बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या पहिल्याहून दुप्पट आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने अनेक निबंध लादले आहेत. कोरोनाची ही परिस्थिती लक्षात घेता या एप्रिल महिन्यात होणारी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने घेतलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे.
    परंतु, एकीकडे दहावीची परीक्षा रद्द केलेली असतानाच बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्याचे नियोजन राज्याचे
शिक्षण विभाग करत आहे. जिथे दिवसागणिक ४० ते ५० हजाराहून अधिक रुग्णसंख्या आपण पाहत आहोत. अशा
वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगणे हे कितपत योग्य आहे? यंदा जवळपास १३ लाख
विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो, हे देखील शिक्षण विभागाने लक्षात घेतले पाहिजे.
   ही सगळी परिस्थिती लक्षात घेता माझी आपणास विनंती आहे की, बारावीची परीक्षा व मूल्यांकन हे ऑफलाइन न घेता त्याचे नियोजन ऑनलाइन पद्धतीनेच करावे. परीक्षा ही नक्कीच महत्त्वाची आहे. मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षेचे नियोजन करावे, अशी मी आपल्याला विनंती करते. शिक्षण विभागाचा हा निर्णय निश्चितच सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गासाठी दिलासादायक असेल.
close