रात्री दोन वाजता नवी मुंबईत लक्झरी बसमधून तो उतरला. त्याला कोपरखैरणेला जायचं होत. पण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता. सुनसान रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं. रिक्षा मिळणार कशी तो चालत राहिला. दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस सुरु झाला रस्त्यावरचे लाईट गेले पण सुदैवाने एक रिक्षा हळूहळू येताना दिसली.
तिला हात केला रिक्षा थांबायच्या आत तो पटकन रिक्षात बसला. रिक्षा पाऊस जोरात पडायला लागला रिक्षा हळू हळू चालत होती. रिक्षा प्रवासात तो नशिबावर खुश झाला. कोपरखैरणे आल्याचं त्याच्या काळोखातही लक्षात आल. आपण मनुष्य वस्तीत आलोया विचाराने त्याला सुरक्षित वाटू लागल. समोरून एक वेगात कार आली कारच्या प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याला थंडीतही घाम फुटला रिक्षा चालत होती पण ड्रायव्हर सिटवर कोणी नव्हतं.
त्याने उसने अवसान आणून रिक्षातून उडी मारली आणि एका देवळात जाऊन बसला. पाऊस संपला सकाळचे सहा वाजले तो देवळा बाहेर आला. तर समोर तीच एक रिक्षा त्याला दिसली त्यात तो बसला पत्ता सांगितला. मग रात्रीचा प्रसंग त्याने रिक्षा वाल्याला वर्णन करून संगीतला तर रिक्षा वाल्याने कचकन ब्रेक दाबला त्याला बाहेर ओढला शिवी देऊन म्हणाला माझी रिक्षा काल रात्री भर पावसात बंद पडली म्हणून मी ढकलत आणत होतो. तू गाढवा त्यात बसला होतास तरीच म्हटलं रिक्षा ढकलताना इतकी ताकद का लावावी लागली.
हसलात ना हसायलाच पाहिजे..
भावानो जीवन हे क्षणभंगुर आहे म्हणूनचं हसा नी हसवा आपलीं व आपल्या परिवाराची काळजी घ्या....!

