प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी, पुणे
पुणे-:द रॉयल प्रेझेंट च्या वतीने घेण्यात येणारे भव्य-दिव्य मॉडेलिंग शो द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र 2021" ची पुणे मध्ये सध्या तयारी सुरू झाली आहे.हा शो पुणे मध्ये लॉकडाऊन नंतर भरविण्यात येणार आहे,अशी माहिती द रॉयल ची मैनेजिंग डायरेक्टर कोमल झगरे यांनी पत्रकारांना दिली.कोरोना मुळे हा शो पुढे ढकलण्यात आला होता.
या शो चे रजिष्ट्रेशन सध्या सुरू असून लवकरच हा शो सर्वाना बघायला मिळेल. मिस्टर.मिस.मिसेस असे या शो चे स्वरुप आहे.या शो मध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रॉयल ब्रँड अम्बेसिडर रेणुकाताई ठाणगे यांनी केले. निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला जाईल. पुणे चे यशस्वी उद्योजक मन्नत कोल्हापूरी मळा चे डायरेक्टर पंकज सारसार या शो स्पॉन्सर करत आहे.या शो मधील विजयी स्पर्धकांना फिल्म ,सॉंग मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यार असल्याचे आयोजक नितीन झगरे यांनी सांगितले.
या शो साठी मराठी फिल्म इंडस्ट्री मधील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहे.शो साठी मुख्य आकर्षण म्हणून मराठी सिनेसृष्टितील कलाकार उपस्थित राहणार आहे.ज्यांना या शो मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी मो. नं..9146241946 /9766873917 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई च्या ब्रँड अम्बेसिडर अनघा गावडे यांनी केले.
हा शो यशस्वी होण्यासाठी संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले ,प्रा.डॉ.आशिष राजपूत,नमिता पाटील ,स्नेहलताई सरगर,सीमाताई राजपूत,मॉडेल निशा शिंदे,मिसेस युनिव्हर्स सविता एस.के,कायदेतज्ज्ञ सुरेखा भोसले, रोहित शिंदे, साईप्रसाद,अभिनेते सुरज कुमार,मार्गदर्शक मयुरेश अभ्यंकर सर ,ऐश्वर्या कुंटे,सागर पतंगे,आकाश रणदिवे,तेजस नाईकवाडी,व्यंकटेश कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

