shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एसटी महामंडळातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिल आणि विशेष रजा मंजूर करा - श्रीमती . मनिषा कालेश्वर


प्रतिनिधी: संजय वायकर

नागपूर (दि.25) : कोविड 19 मदत कक्ष नागपूर ची 18 मे रोजी झालेली बैठक विभाग नियंत्रक साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे योग्यरित्या पार पडली .
 
श्रीमती मनिषा कालेश्वर

नागपूर  येथील विभागीय सचिव श्रीमती मनिषा कालेश्वर यांनी सांगितले की , सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले एसटी कर्मचारी कोरोना रोगानी बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांवर शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत नियमाप्रमाणे 14 दिवस कोरोंटाईन होऊन त्यांना औषध उपचार करावा लागतो . या 14 दिवसांचा कालावधी होऊन बरे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिले आणि  रजा मंजूर करणे आवश्यक असते .परंतु कर्मचाऱ्यांच्या रजा कोरोना आजारामुळे घेण्यात आल्या आहेत आणि हा कोरोना रोग जागतिक, राष्ट्रीय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महामारी म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

त्यामुळे संबंधीत विभागीय  प्रशासनाने गंभीर स्वरूपाच्या महामारीमध्ये कोरोना बाधित झालेल्या कोरोना आजाराचा झालेला वैद्यकीय खर्च पूर्णतः मंजूर करावा आणि घेतलेल्या रजा विशेष रजा म्हणून त्यांचे वेतन काढावे असे त्यांनी विभाग नियंत्रक नागपूर विभाग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .                            

विभागीय प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या या कठीण परिस्थितीत कोविड 19 द्वारे मदत करुन कर्मचाऱ्यांच्या सेवेचे काम करीत आहात आणि अशीच साथ आपली लाभावी असेही त्यांनी सांगितले .

श्रीमती मनीषा सुरेश कालेश्वर या नागपूर येथील महाराष्ट्र एसटी कर्मचारी कांग्रेस विभागीय सचिव आहेत .
close